समाजाप्रति आदरभाव ठेवून सामाजिक ऋण फेडण्याचे काम रोटरी करते

सुदर्शन रापतवार यांचे मत
समाजाप्रति आदरभाव ठेवून सामाजिक ऋण फेडण्याचे काम रोटरी करते असे मत ज्येष्ठ पत्रकार सुदर्शन रापतवार यांनी व्यक्त केले.
रोटरी क्लब ऑफ अंबाजोगाई च्या वतीने दर्पण दिनानिमित्त हॉटेल रसमर्ई येथे आयोजित करण्यात आलेल्या कृतज्ञता कार्यक्रमात सुदर्शन रापतवार बोलत होते. यावेळी व्यासपीठावर रोटरी च्या अध्यक्षा प्रा. रोहिणी पाठक, रो. धनराज सोळंकी, रो. शकील बागवान हे उपस्थित होते.
आपल्या विस्तारीत भाषणात सुदर्शन रापतवार यांनी रोटरी क्लब चे आपण अधिकृत सदस्य नसतांनाही एक सामाजिक बांधिलकी आणि पत्रकार म्हणून गेली ४० वर्षांपासून आपण जोडल्या गेलो आहोत असे सांगून रोटरीच्या अनेक उपक्रमाचे आपण साक्षीदार असल्याचे त्यांनी सांगितले. रोटरी क्लब ऑफ अंबाजोगाई ही आपल्या सदस्यांना समाजाप्रति आदरभाव ठेवून सामाजिक ऋण फेडण्यासाठी चे महत्त्वपुर्ण काम करते असे गौरवोद्गार त्यांनी काढले. रोटरी क्लब चा मागील दहा वर्षांपासूनचा चढता आलेख हा अंबाजोगाई शहराचे वैभव वाढवणारा ठरला आहे असे मत ही त्यांनी व्यक्त केले.

रोटरी क्लब ऑफ अंबाजोगाई ला या वर्षी इंटरनॅशनल रोटरीच्या वतीने लोखंडी सावरगाव येथील शासकीय रुग्णालयास मिळालेले ४० लक्ष रुपयांचे बालकांचे अतिदक्षता युनीट उभारणीचे काम यावर्षी सुरु होणार असल्याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला असून या युनीट उभारणीच्या कामात पत्रकारांनी आपला सहभाग नोंदवत व्यापक प्रमाणात प्रसिद्धी देऊन भविष्य काळात हे युनीट अधिक चांगल्या प्रकारे कशी बालकांच्या आरोग्याची काळजी घेईल यासाठी रोटरी सोबत काम करावे असे आवाहन केले.
दर्पण दिनानिमित्त हा कार्यक्रम आयोजित केला असल्यामुळे त्यांनी पत्रकारांनी बाळशास्त्री जांभेकर यांच्या सारखी सर्व क्षेत्रातील व्यापकता आणि सखोल ज्ञान वाढवत आपली आत्मप्रगती करावी असे आवाहन केले. यावेळी त्यांनी बाळशास्त्री जांभेकर यांच्या विपुल लेखन, सामाजिक कार्य, स्वातंत्र्यपुर्व चळवळीतील सहभाग, अस्खलीत संभाषण कौशल्य , वाग़चातुर्यपणा आणि सर्वच क्षेत्रातील असलेला अभ्यास हे गुण आत्मसात करण्याचा प्रयत्न करावा असे आवाहन केले.

प्रारंभी रोटरी क्लब च्या अध्यक्षा प्रा. रोहिणी पाठक यांनी आपल्या प्रास्ताविकात रोटरी क्लब ऑफ अंबाजोगाई सिटी च्या वतीने राबविण्यात आलेल्या व राबविण्यात येणाऱ्या सर्व कार्यक्रमांची माहिती दिली. अंबाजोगाई रोटरी क्लब ने आज पर्यंत इंटरनॅशनल रोटरी क्लब लाख जेवढा फंड जमा केला त्या सर्व फंडातून इंटरनॅशनल रोटरी क्लब घ्या वतीने लोखंडी सावरगाव येथील शासकीय रुग्णालयात अतिभव्य असे बालकांसाठी अतिदक्षता कक्ष उभारण्यात येणार असल्याची माहिती दिली. अशा प्रकराचा इंटरनॅशनल रोटरी क्लब च्या फंडातून उभारण्यात येणारा हा या विभागातील एक मोठा प्रॉजेक्ट असेल असे त्यांनी सांगितले.

या कार्यक्रमात रो. धनराज सोळंकी, रो. डॉ. नवनाथ घुगे, रो. संतोष मोहीते यांनी लोकरीच्या कामासंबंधी माहिती दिली तर पत्रकार प्रा. प्रदीप तरकसे, रवि मठपती, अविनाश मुंडेगावकर यांनी दर्पण दिनानिमित्त बाळशास्त्री जांभेकर व रोटरी क्लब ऑफ अंबाजोगाई घ्या कामकाजावर प्रकाश टाकला. या कार्यक्रमाचे संचालन व आभार रो. शिवकुमार निर्मळे यांनी मानले. या कार्यक्रमास रो. ओमप्रकाश दहिफळे, रो. राधेश्याम, रो. रामावत व रोटरी क्लब चे इतर सदस्य पत्रकार अभय जोशी, राम जोशी, प्रशांत बर्दापूरकर, अनंत कुलकर्णी, राहुल देशपांडे, व्यंकटेश जोशी, अविनाश मुंडेगावकर,
शिवकुमार निर्मळे व इतर मान्यवर उपस्थित होते.


