बीड

श्री…काय हे…!!!!

जगदीश पिंगळे

काळ कोणासाठीही थांबत नाही हे त्रिकालाबाधीत सत्य श्रीकांत भराडे या माझ्या मनस्वी मित्राच्या जाण्याने पुन्हा एकदा जाणून गेल।।दोनतीन दिवसापूर्वीच दिलीपराव धारूरकरांच्या अचानक जाण्याने मन हळहळून गेले होते।थोडाच पाॅझ झाला आणि कधी नव्हे ते व्हाटसअपवर लोकमतच्या प्रसाद कुलकर्णीची पोस्ट आली ।भराडे कॅन्सरने आजारी आहेत। ।मोबाईल या आभासी जगाचा आता एवढा शाप भोवतोय की आपण आता डायरेक्ट बॅग भरून कोणालाच भेटायला जात नाहीत। ।सर्वच सोपे झाले वाढदिवस असला की केक बुकेचे इमोजी टाकायचे फारच लिहिण्याचा किरम्या असेल तर लिहायचे ।।डेथ न्यूज असेल तर भावपूर्ण श्रध्दांजली। ।बास बाकी आपण कोरडेच राहातो। ।नंतर येते ती भयानक व्याकुळता।।।

श्रीकांत आणि मी लोकमतला दोन तीन महिन्याच्या फरकाने लागलो। ।मी ..श्रीकांत ला श्री।। जयप्रकाश दगडेला जयू कमलाकर जोशीला कमू म्हणतो ।।अर्थात आमचा कंपू असताना ।।महावीरभाई नी श्रीकांतला बापू नाव दिले ।।आणि तो बापू झाला।।कुठल्याही वर्तमानपत्रात प्रादेशिक टेबल हा त्या वर्तमानपत्राच्या खपासाठी महत्वाचा असतो प्रादेशिक प्रमुखाला ग्रामीण भागातील वार्ताहरापासून ते शहरीवार्ताहरापर्यत जाळे विणावे लागते।।वातार्हर निवडतांना विशेष काळजी घ्यावी लागते त्या भागाची माहिती राजकीय विश्व सर्वच प्रादेशिक प्रमुखाला आवश्यक असते ही जवाबदारी श्रीकांत छान निभवायचा ।।आपती व्यवस्थापन हेही वर्तमान पत्रात असते एखाद्या पत्रकाराने काही गडबड केली की ते निस्तारणे प्रादेशिक प्रमुखावर येते।। स्पेशल टास्क फोर्स म्हणून एकाद्या ठिकाणी अचानक कव्हरेजला जावे लागे हे सर्व श्रीकांत लिलया सांभाळीत असे।।सुंदर हस्ताक्षर। नीट नेटकी बातमी लिहिणे।।कुणालाही न दुखावत बातमीतील ग्यानबाची मेख शोधणे यात तो वाक्बगार होता।।

लोकमत मध्ये तेव्हाचे दिवस मंतरलेले होते

।मतभेद होते पण मनभेद नव्हते म्हणून आजही आम्ही लोकमतच्या अज्ञात धाग्याने गुंफलेलो आहोत।।भले आमच्या भेटी वर्षानुवर्ष होत नाहीत।पण भेटलो तर अनेक आठवणी निघतात। ।काय चाललय …श्री ये ना बीडला असे म्हटले की चल बेट्या आगावू आहेस तू तरी कुठे येतोस परभणीला आल्यावर घरी। ।।खरच आपण या जगात किती कोष ओढवून घेतलेत।।असात मी… माधुरी दातार; भगवान दातार सुनिल देशपांडे ला फोनवर बोललो इतके हलके वाटले।। अनेकदा वाटते बॅग भरावी आणि औरंगाबादेत लोकमत ब्युरोत जावून गप्पा मारीत बसावे ; राजेंद्र बाबुजींची भेट आणि त्यांनी काय म्हणतात जावई आणि कन्या असे म्हणत खूप वेळ द्यावा

।।प्रादेशिक टेबलला जावे ।।
।। प्रसाद; बान्ते ; गुंडाभाऊ; मेरे मामा म्हणत मला आपुलकी दाखविणार्या मुजीब ।। ।। शांतीलाल गायकवाडला भेटावे।
।। मोहन राठोड नेहमी टच मध्ये असतो।।
।। जंगले फेसबुकवर टच मध्ये असतो।।
।। चक्रधर बी।ए।मुळे यांची भेट होते। कितीतरी ।।
।।आठवणी।।
।। श्रीकांत तुझे अचानक जाणे ।।
शब्द नाहीत।

साभार जगदीश पिंगळे/अंबाजोगाई/बीड यांच्या वॉल वरून

Team Madyam

Madhyam Network / Madhyam News #माध्यम या मराठी चॅनलवर आपलं स्वागत.महाराष्ट्रासह राष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी अगदी सोप्या शब्दांत खास आपल्या साठी

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker