…याची कल्पना शिंदेंनाही नसावी, दुसरं आश्चर्य हे की… शरद पवारांनी मांडलं आपलं मत
याचं उदाहरण म्हणजे देवेंद्र फडणवीसांना उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घ्यावी लागली
![sharad-pawar](https://madhyamnews.com/wp-content/uploads/2022/06/sharad-pawar-1-scaled.jpg)
![sharad-pawar](https://madhyamnews.com/wp-content/uploads/2022/06/sharad-pawar-1-scaled.jpg)
Sharad Pawar Devendra Fadnavi : एकनाथ शिंदे हे महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री होणार, अशी घोषणा भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. शिंदेंचा शपथविधीही आजच पार पडला आहे. यावेळी त्यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा उल्लेख केला. दरम्यान, एकनाथ शिंदे हे महाराष्ट्राचे 30 वे मुख्यमंत्री असणार आहेत. (Sharad Pawar on Oath ceremony Eknath shinde Devendra Fadnavis)
![Sharad Pawar](http://madhyamnews.com/wp-content/uploads/2022/06/sharad-pawar-1024x693.jpg)
![Sharad Pawar](http://madhyamnews.com/wp-content/uploads/2022/06/sharad-pawar-1024x693.jpg)
एकनाथ शिंदे यांनी हिंदूहदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे यांचे नाव घेऊन सुरुवात केली. व मुख्यमंत्री पदाची आणि गोपनीयतेची राजभवनात शपथ घेतली. यानंतर राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेत राज्यात नेतृत्व बदलाची बंडखोरांची मागमी असावी, आणि त्या बदल्यात कुणाला तरी काम करण्याची संधी मिळावी. जे आसाममध्ये गेले होते, त्यांची अपेक्षा उपमुख्यमंत्रीपदापेक्षा जास्त होती असे वाटत नाही. अस मत शरद पवार यांनी मांडले आहे.
भाजपात जर आदेश आला दिल्ली किंवा नागपूरहून, तर त्या आदेशामुळे राज्याच्या मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी शिंदेंना देण्यात आली असेल. याची कल्पना शिंदेंनाही नसावी. दुसरं आश्चर्य हे की, आदेश दिल्यानंतर तो आदेश तंतोतंत पाळावा लागतो. याचं उदाहरण म्हणजे देवेंद्र फडणवीसांना उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घ्यावी लागली. हा आश्चर्याचा धक्का होता. दरम्यान, फडणवीस यांनी शिंदे यांच्या नावाची घोषणा केल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दोनवेळा त्यांना फोन केला. मोदींच्या आग्रहानंतर फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री होण्यास होकार दिला. मंत्रिमंडळात काम करण्याऐवजी मला पक्षवाढीसाठी काम करण्याची संधी द्या, असं फडणवीस यांनी पक्ष नेतृत्त्वाला सांगितलं. मात्र फडणवीस यांची मागणी अमान्य करण्यात आली. त्यानंतर फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री होण्याची मागणी मान्य केलं.