महाराष्ट्र

पद्मश्री उमाकांत गुंदेचा यांना यावर्षीचा पद्मश्री शंकरबापू धृपद गौरव पुरस्कार

४ जानेवारी रोजी होणार वितरण

आंतरराष्ट्रीय पातळीवरील प्रख्यात धृपद गायक पद्मश्री उमाकांत गुंदेचा यांना यावर्षीचा पद्मश्री शंकरबापू धृपद गौरव पुरस्कार जाहीर करण्यात आला असून ४ जानेवारी रोजी या पुरस्काराचे वितरण आणि पद्मश्री उमाकांत गुंदेचा व अनंत गुंदेचा यांच्या धृपद गायन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे अशी माहिती पं. उध्दवबापू आपेगावकर यांनी दिली आहे.

तपस्वी पखवाज साधक पद्मश्री शंकरबापू यांच्या २२ व्या पुण्यस्मरण निमित्ताने ४ जानेवारी २०२६ रोजी हॉटेल इट ऍन्ड स्टे च्या फंक्शन हॉल मध्ये सायंकाळी ६:३० वाजता या दिमाखदार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून या कार्यक्रमात पद्मश्री उमाकांत गुंदेचा यांना हा पुरस्कार देवून गौरविण्यात येणार आहे.


या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी खा. बजरंग सोनवणे हे प्रमुख अतिथी म्हणून नगराध्यक्ष नंदकिशोर मुंदडा हे उपस्थित राहणार असून एम आय टी पुणे चे कार्यकारी अध्यक्ष डॉ. मंगेश कराड यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.


या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून सेवानिवृत्त आयुक्त उमाकांत दांगट, माजी नगराध्यक्ष राजकिशोर मोदी आणि सामाजिक कार्यकर्ते डॉ. नंदकिशोर मुंदडा हे उपस्थित राहणार आहेत.

या पुरस्कार प्रदान कार्यक्रमानंतर लगेचच पद्मश्री उमाकांत गुंदेचा आणि अनंत गुंदेचा यांच्या धृपद गायनाचा कार्यक्रम होणार असून त्यांना पखवाजवर साथ पं. उध्दवबापू आपेगावकर हे देणार आहेत.
या कार्यक्रमास सर्व रसिक श्रोत्यांनी व पद्मश्री शंकरबापू आपेगावकर यांच्या वर स्नेह करणा-यांनी उपस्थित रहावे असे आवाहन उध्दवबापू आपेगावकर व पद्मश्री शंकरबापू आपेगावकर परिवाराने केले आहे.

Sudarshan Rapatwar

महाराष्ट्रातील प्रगल्भ पत्रकार मराठवाड्यातील पत्रकारितेला एक नवा आयाम देण्याचा त्यांचा यशस्वी प्रयत्न असतो. गावातील पत्रकारिता जिल्ह्यात, राज्य आणि देश पातळीवर नेण्यात त्यांचे मोठे योगदान आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button