![](https://madhyamnews.com/wp-content/uploads/2022/07/Saptashrungi.png)
![](https://madhyamnews.com/wp-content/uploads/2022/07/Saptashrungi.png)
नाशिक / Nashik Saptashrungi Gad : नाशिकच्या (Nashik) सप्तशृंगी गडावर ( Saptashrungi Gad) काल सायंकाळच्या सुमारास ढगफुटी सदृश्य पावसाने हजारी लावली. यावेळी मंदिराकडे जाणाऱ्या पायऱ्यांवर पुराचा लोंढा आल्याने भाविक जखमी झाले होते. या सर्व पार्श्वभूमीवर आता सप्तशृंगी देवी मंदिर पुढील दीड महिना बंद राहणार असल्याची माहिती सप्तशृंगी देवी ट्रस्ट (Saptashrungi Devi Trust) वतीने देण्यात आली आहे.
नाशिक जिल्ह्यातील ( Nashik District) वणी येथील सप्तशृंगी गडावर चार वाजेच्या सुमारास ढगफुटी सदृश्य पावसामुळे भाविक भयभीत झाले होते. अचानक आलेल्या पावसामुळे भाविकांची तारांबळ होऊन सहा ते सात भाविक जखमी झाले होते. या मंदिर मार्गावर मोठ्या प्रमाणात गाळ, दगड, कचरा इतर साहित्य येऊन पडल्याने मार्ग देखील खचल्याचे पाहायला मिळाले. त्यामुळे आता सप्तशृंगी देवी ट्रस्टनेनाशिक जिल्ह्यातील साडे तीन शक्ती पीठांपैकी एक असलेल्या सप्तशृंगी गडावर भाविकांचा मोठा राबता असतो. अशातच गेल्या तीन दिवसांपासून सुरु असलेल्या पावसामुळे जिल्ह्यात अनेक गावातील संपर्क तुटला आहे. तर काल सायंकाळी सप्तशृंगी मंदिर मार्गावर अचानक झालेल्या ढगफुटीमुळे भाविकांना सुचेनासे झाले. यानंतर या मार्गाची दयनीय अवस्था झाली असून मंदिर गाभाऱ्यात देखील स्वच्छतेची आवश्यकता असल्याचे मंदिर प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. या ठिकाणी संपूर्ण परिसराची त्या कामाची देखभाल दुरुस्ती करावी,बाधकाम करण्यासाठी देवस्थान ट्रस्टला वळ आवश्यक असल्याने मंदिर बंदचा निर्णय घेण्यात आलेला आहे. त्यामुळे पुढील ४५ दिवस म्हणजे दीड महिना सप्तशृंगी देवीचे दर्शन घेता येणार नाही.
नाशिक जिल्ह्यात सुरु असलेला, त्यातच सप्तश्रुंगी गडावर झालेली ढगफुटी यामुळे या परिसराची देखभाल करण्यात येणार आहे. टायचबरोबर देवी मूर्तीचे संवर्धन करण्यात येणार असल्याने २१ जुलै पासून ते पाच सप्टेंबर पर्यंत मंदिर हे पूर्णपणे बंद राहणार आहेत. तयामुळे सप्तश्रुंगी देवीचे दर्शन भाविकांना घेता येणार नाही. तर भाविकांच्या सोयीसाठी देवीचे दर्शन घेण्यासाठी मंदिराची शेवटच्या पायरीवर देवीची एक छोटी मूर्ती ठेवली जाणार आहे. त्या मूर्तीद्वारे भाविकांना दर्शन घेता येणार आहे.
सप्तश्रुंगी गडावरील ढगफुटी
सप्तश्रुंगीगड मंदिराच्या वरील बाजूने अतिवृष्टी होऊन सर्व पुराचे पाणी पायऱ्यांनी खाली उतरले. ळी उतरली पायरी असल्याने चढ मार्गावर परिस्थिती निर्माण झाली. यावेळी पुराबरोबर मोठ्या संख्येने दगड गोटे, माती, झाडांचे रोपटे देखील वाहून आल्यानें मंदिरात जात असलेल्या भाविकांची धावपळ उडाली. घटनेत सात भाविकांना किरकोळ इजा झाली होती. त्यांना उपचारासाठी धर्मार्थ आणि ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. शिवाय घटनास्थळी सप्तश्रुंगी देवी ट्रस्ट चे अधिकारी उपस्थित असून जिल्हा आपत्ती व्यवस्थापन टीम आणि की कमांडो फोर्सने विशेष परिश्रम घेऊन भाविकांना सरक्षित स्थळी हलविले.