पिडीत महिलांसाठी ग्रामीण विकास मंडळाने केली सखी केंद्राची सुरुवात
![](https://madhyamnews.com/wp-content/uploads/2022/09/IMG_20220908_154127.jpg)
![](https://madhyamnews.com/wp-content/uploads/2022/09/IMG_20220908_154127.jpg)
अध्यक्ष एस. बी. सय्यद यांची माहितीग्रामीण विकास मंडळाने जिल्हा महिला व बालविकास खात्याअंतर्गत पिडीत महिलांसाठी सखी केंद्राची सुरुवात केली असल्याची माहिती मंडळाचे अध्यक्ष एस. बी. सय्यद यांनी दिली.
या संदर्भात अधिक विस्ताराने माहिती देताना एस बी सय्यद पुढे म्हणाले की,१० वर्षांपूर्वी म्हणजे १६ डिसेंबर २०१२ रोजी दिल्लीत निर्भया गॅंगरेप व हत्याकांड घडले. त्यावेळी संपूर्ण देश हादरला व सुन्न झाला होता. भविष्यात त्याची पुनरावृत्ती देशात इतरत्र होऊ नये म्हणून व झालीच तर तात्काळ पिडीतेला सर्व प्रकारच्या सुविधासह न्याय मिळावा व गुन्हेगाराला शिक्षा व्हावी म्हणून १ एप्रील २०१५ रोजी तत्कालीन केंद्र सरकारच्या महिला व बाल कल्याण खात्याने प्रत्येक जिल्ह्यात One Stop Crisis Centre अर्थात सखी केंद्र स्थापन करून बेटी बचावाचे धोरण कडकपणे राबविण्याचे ठरविले. महाराष्ट्रातही याची २०१९ पासून सुरूवात झाली. बीडमध्ये मात्र अद्याप असे केंद्र स्थापन झाले नव्हते.
नुकतेच म्हणजे १ सप्टेंबर २०२२ पासून शासनाने ग्रामीण विकास मंडळाला बीडच्या सिव्हील हॅास्पिटलमध्ये मोकेशीर जागी प्रशस्त असे सखी केंद्र (One Stop Crysis Centre ) प्राधान्यक्रमाणे मंजूर करून लगेच कार्यान्वित करण्याचा आदेश दिला. यासाठी जिल्हाधिका-यांचे अध्यक्षतेखालील ११ सदस्यीय जिल्हा व्यवस्थापन समिती गठीत करण्यात आली. या समितीत पोलीस अधीक्षक, जिल्हा शल्य चिकित्सक, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी, बार कौंसीलचे अध्यक्ष, विधीसेवा प्राधिकरणाचे सचिव, ऊप मुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत), बीड नगर परिषदेच्या ३ महिला सदस्या, जिल्हा संरक्षण अधिकारी व विधी सल्लागारांचा सामावेश आहे.
![](https://madhyamnews.com/wp-content/uploads/2022/09/IMG_20220908_154048.jpg)
![](https://madhyamnews.com/wp-content/uploads/2022/09/IMG_20220908_154048.jpg)
ग्रामीण विकास मंडळाचे मागील चार दशकाचा महिला क्षेत्रातील ऊल्लेखनीय कामाचा आढावा घेऊन एकमताने मंजूरी दिली. या बैठकीत संस्थाध्यक्ष सय्यद एस बी यांनी जिल्हाधिका-यांनी व समिती सदस्यांनी ऊपस्थित केलेल्या प्रत्येक शंकेचे समाधान करून विचारलेल्या सर्व प्रश्नांची मुद्देसूदपणे व समर्पक अशी ऊत्तरे देऊन स्पष्टीकरण सादर केले व सदरील सखी केंद्र ऊत्तमरित्या चालविण्याची हमी देऊन क्षमता असल्याचे समितीला सिध्द करून दाखविले. तसेच ग्रामीण विकास मंडळाने नियुक्त केलेल्या खालीलप्रमाणे १४ जणांच्या अनुभवी व तज्ज्ञ अशा स्टाफलाही समितीने लगेच मान्यता दिली.
केंद्र प्रशासक – श्रीमती खांडेकर शांता (MA, MSW), केस वर्कर(दिवसा)- कु. भद्रे प्रियंका (BA,MSW)
केस वर्कर (रात्रपाळी) – कु. घोळवे दीपा (BA,MSW), लिगल एड ॲंड कौंसीलर (महिला)-ॲड. सौ. कुलकर्णी सारिका (B.Sc., LLB), पोलीस फेसीलीटेटर ॲाफीसर- सय्यद मजहर अली (निवृत्त PSI), लिगल कौंसीलर (पुरूष) – ॲड. पंडीत विजय(M.Sc., LLB), वैद्यकीय सहाय्यक -कु. शेख कदीरा (GNM), मनो-सामाजिक समुपदेशक- कु. शेप आश्विनी ( BA, MSW), आय टी पर्सोनेल – अब्दुल कलाम (MA, MSCIT, Typist),
मल्टी परपज हेल्पर (रात्रपाळी) – सौ. मस्के किश्किंदा (होमगार्ड), मल्टी परपज हेल्पर (दिवसा) – श्रीमती नरवडे कविता (ANM), सुरक्षा रक्षक – भोंडवे शिवाजी (माजी सैनिक, शेख तौफीक (होम गार्ड) व शेख मदिना ( होमगार्ड)
एकाच छताखाली कौटुंबिक सामाजिक हिंसाचार पिडीत, लैंगिक शोषणाच्या पिडीत व मानवी वाहतुकीस बळी पडलेल्या महिलांना निवारा, भोजन, वैद्यकीय सुविधा, पोलीस मदत, गुन्हा नोंद करून कायदेशीर न्यायालयीन मदत, सर्व प्रकारचे समुपदेशन आदि सेवा तात्काळ आणि अहोरात्र ऊपलब्ध करून दिल्या जातील.
नुकत्याच कार्यान्वित झालेल्या ह्या केंद्रांचे सद्या सुशोभीकरण, फर्निशींग व सेट अपचे काम चालू असून त्याचे औपचारिक ऊद्घाटन थाटामाटात यथावकाश करण्यात येणार आहे. या सुविधांचा गरजूंनी फायदा करून घेण्याचे व त्यांना बीड येथे केंद्रापर्यंत पाठविण्याचे संस्था, संघटना, पोलीस प्रशासन व इस्पितळांना आवाहन केले आहे. अशी माहिती अध्यक्ष सय्यद एस बी यांनी माध्यमाशी बोलताना दिली.