मनसेला मंत्री पद देण्यास केंद्रीय सामाजिक, न्याय मंत्री रामदास आठवले यांचा विरोध
मंत्रीमंडळात एखादे मंत्री पद आम्हाला मिळणार अशी आशा केंद्रीय सामाजिक न्याय खात्याचे मंत्री रामदास आठवले (Ramdas Athawale) यांनी व्यक्त केली आहे. मनसेला मंत्रीमंडळात घेण्याचा काही संबंधच येत नाही. ते काही निवडणूकीत आमच्या सोबत नव्हते. त्यांना मंत्रीपद देण्याचा विचार होत असेल तर आमचा विरोध असेल असे ही केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी सांगितले. इतकेच नाही टू थर्ड पेक्षा जास्त आमदार ज्यांच्या बाजूने आहेत. तिच खरी शिवसेना असे विधान आठवले यांनी केले आहे.कल्याणचे पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष दयाल बहादूरे (Dayal Bahadure) यांच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमानिमित्त ते अत्रे रंगमंदिरात आले होते.
रामदास आठवले यांनी या आधीही मनसेवर सडकून टीका केली होती
मनसेला मंत्रीमंडळात घेण्याचा काही संबंधच येत नाही. ते काही निवडणूकीत आमच्या सोबत नव्हते. त्यांना मंत्रीपद देण्याचा विचार होत असेल तर आमचा विरोध असेल असे ही केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी सांगितले. काही महिन्या पूर्वी राज ठाकरे यांच्या लाऊडस्पीकरच्या वादग्रस्त भूमिके बद्दल सुद्धा आठवलेंनी टीका केली होती. पुणे येथे 23 एप्रिल रोजी केंद्रीय सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्री आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे (आरपीआय) प्रमुख रामदास आठवले यांनी शनिवारी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर सडकून टीका केली आणि लाऊडस्पीकरबाबत ठाकरे यांच्या भूमिकेला आरपीआय समर्थन देत नाही असे हि ते या वेळी बोलले होते. “राज ठाकरे हे लढाऊ नेते आहेत. मशिदीवरील लाऊडस्पीकरच्या सुरक्षेसाठी आमच्या पक्षाचे कार्यकर्ते तैनात केले जातील,” असे आठवले म्हणाले.पुण्यात पत्रकार परिषदेत बोलताना रामदास आठवले म्हणाले, “राज ठाकरे हे मोठे नेते आहेत. तो मोठा लढाऊ नेता आहे. लाऊडस्पीकर काढण्याबाबत त्यांची भूमिका चुकीची आहे. त्यांना हवे असेल तर ते मंदिरांवर लाऊडस्पीकर लावू शकतात,पण मशिदींवरून भोंगे काढायला ते सांगू शकत नाहीत.”
सोमवारच्या न्यायालयीन निकालावर आमचे लक्ष आहे, टू थर्डपेक्षा जास्त आमदार, ज्यांच्याकडे आहेत, तीच खरी शिवसेना आहे.
उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्या नेतृत्वाला कंटाळून नेते शिवसेना नवीन बनवण्याचा प्रयन्त आहे. अनेक वक्तव्यांचा खरपूस समाचार घेण्यासाठी हे सगळे आमदार वेगळे झाले आहेत, त्यांनी वेगळा गट स्थापन केला आहे. एकनाथ शिंदे यांच्या समर्थानात टू थर्ड पेक्षा जास्त आमदार आहेत, म्हणून तिच खरी शिवसेना आहे. एकनाथ शिंदे यांनी भाषणात सांगितले होते की, आमच्या दोघांकडे 164 लोक आहेत, पुढच्या वेळी आम्ही प्रत्येकी 100 लोक निवडून आणू आणि ते दोघे मिळून आणतील सुद्धा अशा मला खात्री आहे असे या वेळी आठवले म्हणाले.
मंत्री मंडळाच्या विस्तारात आरपीआयला मंत्रीपद मिळणार?
त्यावर ते म्हणाले “सध्या अधिवेशनापूरते मंत्री मंडळ हे ठराविक मंत्र्याचे होणार आहे, मात्र जेव्हा मंत्री मंडळाचा विस्तार होईल तेव्हा एखादे मंत्री पद आरपीआय नक्कीच मिळेल. आणि ते नाही मिळालं तर एखादे एमएलसी, महामंडळ अध्यक्ष उपाध्यक्ष पद आरपीआयला मिळावे यासाठी आमचे प्रयत्न आहेत. आणि त्यासाठीच आरपीआयचा नव्या सरकारला पाठींबा आहे.”