अंबाजोगाई

उद्योजक प्रदीप ठोंबरे यांना रोटरी भूषण पुरस्कार प्रदान

अंबाजोगाई / रस्ते व इमारत बांधकाम क्षेत्रातील अग्रगण्य संस्था असलेल्या यश कन्स्ट्रक्शनचे संचालक युवा उद्योजक प्रदीप ठोंबरे यांना रोटरी क्लब ऑफ अंबाजोगाई सिटीचा २०२०-२०२१ रोटरी भूषण पुरस्कार शनिवारी (दि.१६) प्रदान करण्यात आला.

रोटरी क्लब ऑफ अंबाजोगाई सिटी २०२२-२०२३ पदग्रहण सोहळ्यात युवा उद्योजक प्रदीप ठोंबरे यांना रोटरी भूषण पुरस्कार देण्यात आला. यावेळी त्यांच्या पत्नी अनिता प्रदीप ठोंबरे, अदिती प्रदीप ठोंबरे,यश प्रदीप ठोंबरे व ठोंबरे कुटुंबाच्या उपस्थित रोटरी भूषण पुरस्कार देण्यात आला.पुरस्काराचे स्वरूप सन्मानचिन्ह,सन्मानपत्र, शाल, श्रीफळ,पुष्पगुच्छ होते. या कार्यक्रमास अध्यक्षा म्हणून रो.स्वाती हेरकाळ तर सहाय्य प्रांतपाल रो.उमाकांत थोरात, मा.रो.अध्यक्ष विवेक गगणे, मा.रो.सचिव रोहिणी पाठक, रोटरीचे नवनिर्वाचित अध्यक्ष रो.मोईन शेख,रो.सचिव भीमाशंकर शिंदे व या कार्यक्रमास रोटरी क्लब ऑफ अंबाजोगाई सिटीचे मेम्बर, शहरातील सामाजिक,राजकीय तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती होती. दरम्यान,प्रदीप ठोंबरे यांचे सर्वस्तरातून अभिनंदन केले जात आहे.

Team Madyam

Madhyam Network / Madhyam News #माध्यम या मराठी चॅनलवर आपलं स्वागत.महाराष्ट्रासह राष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी अगदी सोप्या शब्दांत खास आपल्या साठी

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker