ठळक बातम्या

ओबीसी आरक्षण निर्णय संदर्भात मुंडे भाऊ आणि बहिणीची प्रतिक्रिया

आरक्षणाची प्रतिक्षा करणा-या ओबीसी समाजाला न्याय मिळाला पंकजा मुंडे

मुंबई / राजकीय आरक्षणाची आतुरतेने प्रतिक्षा करणाऱ्या तमाम ओबीसी वर्गाला न्याय मिळाला आहे अशा शब्दांत भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत केले आहे.

ओबीसींच्या राजकीय आरक्षणाच्या निर्णया संदर्भात सर्वोच्च न्यायालयात आज सुनावणी झाली. न्यायालयाने आरक्षणाच्या निर्णयाला मान्यता दिल्याने ओबीसींच्या आरक्षणाचा मार्ग मोकळा झाला आहे. यासंदर्भात ट्विट करत पंकजाताईंनी या निर्णयाबद्दल आनंद व्यक्त केला आहे. “ओबीसी आरक्षण… स्वागत स्वागत स्वागत… आतुरतेने प्रतीक्षा करणाऱ्या समस्त ओबीसींना न्याय.. राजकीय भविष्यावरील टांगती तलवार दूर.. सरकारचे आभार… आणि सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत…” असं ट्विट त्यांनी केलं आहे.

ओबीसींच्या भावना जपण्यासाठी प्रयत्न केलेल्या सर्वांचेच आभार आ. धनंजय मुंडे

महाविकास आघाडी सरकारने नेमलेल्या बांठिया आयोगाच्या शिफारसी स्वीकारून सर्वोच्च न्यायालयाने आज स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांमध्ये 27% ओबीसी आरक्षणाचा मार्ग मोकळा केला आहे, या निर्णयाचे माजी मंत्री आ. धनंजय मुंडे यांनी स्वागत केले आहे. महाविकास आघाडी सरकारने नेमलेल्या बांठिया आयोगाने सादर केलेल्या अहवालासह ट्रिपल टेस्ट व अन्य बाबी सर्वोच्च न्यायालयाने स्वीकारल्या असून, ओबीसींच्या 27% पर्यंत मर्यादेतील आरक्षणासह निवडणुका 2 आठवड्यात जाहीर कराव्यात असा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने आज जाहीर केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने व वैयक्तिक आम्ही देखील ओबीसी आरक्षणाच्या शिवाय निवडणुका नकोत, किंवा त्या घेतल्याच तर आम्ही निवडणूक लढवत असलेल्या ठिकाणी 27% जागा ओबीसी उमेदवारांना देऊ, अशी भूमिका यापूर्वीच घेतली होती. त्यामुळे आज या निकालाचा आनंद आहे, पक्षस्तरावर व व्यक्तिगत रित्या मी या निकालाचे स्वागत करतो, असेही धनंजय मुंडे म्हणाले.

 

Team Madyam

Madhyam Network / Madhyam News #माध्यम या मराठी चॅनलवर आपलं स्वागत.महाराष्ट्रासह राष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी अगदी सोप्या शब्दांत खास आपल्या साठी

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker