दगडु लोमटे यांच्या ‘राहुन गेलेली पत्रे’ या पुस्तकाचे १ ऑगस्टला प्रकाशन
![](https://madhyamnews.com/wp-content/uploads/2022/07/dagadu-lomte.png)
![](https://madhyamnews.com/wp-content/uploads/2022/07/dagadu-lomte.png)
अंबाजोगाई – दगडू लोमटे लिखित ‘राहून गेलेली पत्रे’ या पुस्तकाचे प्रकाशन एक ऑगस्ट रोजी साहित्यिक प्रा. रंगनाथ तिवारी, गांधीवादी विचारवंत प्राचार्य सोमनाथ रोडे यांच्या हस्ते व मुक्त पत्रकार व साहित्यिक अमर हबीब यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. अशी माहिती मसापचे सचिव गोरख शेंद्रे व प्रतिमा पब्लिकेशन पुणेचे प्रकाशक डॉ.दीपक चांदणे यांनी दिली आहे.
दगडू लोमटे यांनी ‘राहून गेलेली पत्रे’ या सदरात महाराष्ट्रातील साहित्यिक, कलावंत, पत्रकार, अभिनेते, सांस्कृतिक क्षेत्रातील मान्यवर, राजकीय व सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांना दीर्घ पत्रांची मालिका लिहिली होती. त्याला अनेक मासिके, साप्ताहिके, दिवाळी अंक, दैनिके, पाक्षिके व फेसबुक , फेसबुक पेज व वेबपेज वरून प्रकाशित झाली होती. त्याचे पुस्तक रूपाने ते प्रतिमा पब्लिकेशन पुण्याच्या वतीने प्रकाशित होत आहे. दगडू लोमटे यांचे हे पहिलेच पुस्तक प्रकाशित होत आहे.
![](http://madhyamnews.com/wp-content/uploads/2022/07/IMG-20220727-WA0355-200x300.jpg)
![](http://madhyamnews.com/wp-content/uploads/2022/07/IMG-20220727-WA0355-200x300.jpg)