बाळापूर व रत्नाळी मालगुजारी तलावाचे पुनरुज्जीवन केल्यामुळं या पावसाळ्यात ते पूर्ण क्षमतेने भरले.
![](https://madhyamnews.com/wp-content/uploads/2022/08/WhatsApp-Image-2022-08-07-at-12.53.46-PM-1.jpeg)
![](https://madhyamnews.com/wp-content/uploads/2022/08/WhatsApp-Image-2022-08-07-at-12.53.46-PM-1.jpeg)
नांदेड संतोष कुलकर्णी / नांदेड जिल्हा हा गोदावरीच्या खोर्यात आग्नेय महाराष्ट्रात वसला आहे. नांदेड जिल्ह्याच्या पूर्व भागात धर्माबाद हा सीमावर्ती भागातील विकासाच्या मार्गावर असलेला एक तालुका आहे. या धर्माबादची ओळख ही हुतात्मा गोविंद पानसरे ,येथी सुप्रसिद्ध मिरची, हळद, तांदूळ ,चिंच मार्केट यामुळे महाराष्ट्रात आहेच याशिवाय आगळीवेगळी ओळख म्हणजे निजामकालीन येथे असलेली ३९ मालगुजारी तलाव ही आहे. पण सध्या हे तलाव गाळासह घाणीच्या विळख्यात सापडले आहे. नाल्यांचे घाण पाणी, कचरा थेट तलावात मिसळल्याने तलावातील मासे व त्यावर अवलंबून असलेल्या पशु, पक्ष्यांसाठी अपायकारक ठरण्याची शक्यता निर्माण झाली होती.
![बाळापूर तलाव](http://madhyamnews.com/wp-content/uploads/2022/08/WhatsApp-Image-2022-08-07-at-12.53.46-PM-1-1-1024x768.jpeg)
![बाळापूर तलाव](http://madhyamnews.com/wp-content/uploads/2022/08/WhatsApp-Image-2022-08-07-at-12.53.46-PM-1-1-1024x768.jpeg)
तलावाच्या आजुबाजूचा परिसर प्रदुषणमुक्त करुन ऐतिहासिक तलावाला नवसंजीवनी द्यावी अशी मागणी पर्यावरण प्रेमींकडून केली जात असल्याने पर्यावरण अभ्यासक प्रा. डॉ परमेश्वर पौळ यांनी इंडो ग्लोबल सोशल सर्व्हिस सोसायटीच्या सहकार्यातून धर्माबाद तालुक्यातील बाळापूर व रत्नाळी तलावांचे पुनरुज्जीवन करण्याचे ठरवले. प्रा. डॉ. परमेश्वर पौळ त्यांच्या मार्गदर्शनाखाली बाळापूर व रत्नाळी या दोन्ही तलावातून २ लक्ष ५० हजार घनमीटर गाळ काढून तो शेकडो शेतकऱ्यांच्या शेतात टाकला आहे. गाळ काढल्याने गावकऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसत आहे. कारण यातून गुराना,पक्षाना खूलेपाणी , शेतीसाठी पाणी साठा वाढण्याबरोबर या कामातून भूजल पातळी वाढून या भागातील भूजलातील टी.डी.एसचे वाढलेले प्रमाण देखील कमी होणार आहे.
पाण्याच्या उपलब्धी बरोबर तलावातील गाळ शेतात टाकल्याने शेतीची सुपिकता वाढून मिरची, सोयाबीन व हरभरा यासारख्या पिकाच्या उत्पादनात भरघोस वाढ होणार आहे. दगडाची पीचिंग करून तलावाला मजबूत केले आहे. भविष्यात या तलावाचे सुशोभिकरण झाल्यानंतर हे ऐतिहासिक तलाव पर्यटकांचे आकर्षक बनतील असे मत गावकरी व्यक्त करत आहे. या पर्यावरण संवर्धनाच्या कामातून आर्थिक प्रगतीतून होणार असा विश्वास आहे. या निसर्ग संवर्धनाबरोबरच जनकल्याणकारी कामाबद्दल डीयाजोची ग्लोबल टीम , युरोची पी.डब्ल्यू , सी. टीम व नांदेडचे जिल्हाधिकारी मा. डॉ. विपीन इटनकर यांनी याकामात सहयोग देणार्या सर्व टीमचे अभिनंदन केले. हा प्रकल्प यशस्वी होण्यासाठी इंडो ग्लोबल सोशल सर्व्हिस सोसायटीचे राज्यसमन्वयक सौ. एकता बार्टारिया इंडो ग्लोबल सोशल सर्व्हिस सोसायटीच्या स्थानिक टीमने हा मेहनत घेतली.