राजकारण

राहुल गांधी यांनी घेतली लिंगायत पंथाची दीक्षा

कर्नाटकमधील चित्रदुर्गा येथे लिंगायत पंथाचा एक प्रसिद्ध मठ आहे. हा मठ मुरुगा मठ नावानेही ओळखला जातो. राहुल गांधी यांनी आज येथे मठाचे प्रमुख डॉ शिवमूर्ती मुरूगा शरणरू स्वामी यांची भेट घेतली. यानंतर काँग्रेसच्या अनेक नेत्यांच्या उपस्थितीत मठाच्या मुख्यांनी त्यांना इष्टलिंग दीक्षा दीली आणि नियमाप्रमाणे, त्यांच्या डोक्यावर भभूताचे त्रिपुण्ड लावले.

राहुल गांधी यांना इष्टलिंग दीक्षा दिली जात असताना, मठाच्या वतीने, राहुल गांधी लिंगायत पंथाची दीक्षा घेत आहेत, हा एक एतिहासिक क्षण आहे, अशी घोषणाही करण्यात आली.

लिंगायत पंथ अथवा संप्रदाय म्हणजे? 


लिंगायत पंथ अथवा संप्रदाय हा संत बसवन्ना यांच्या सिद्धांतांवर चालणारा एक पंथ आहे. यात कुठल्याही धर्माच्या व्यक्तीला लिंगायत पंथ स्वीकारण्याचे स्वातंत्र्य आहे. या प्रक्रियेअंतर्गत इष्टलिंग दीक्षा ग्रहण करणाऱ्यांना लिंगायत पंथाचे मानले जाते.

कशा प्रकारे स्वीकारला जातो लिंगायत पंथ? 

इष्टलिंग दीक्षेच्या या प्रक्रियेअंतर्गत, लिंगायत संत लिंगायत संप्रदाय स्वीकारणाऱ्याला मंत्रोच्चारासह इष्टलिंग धारण करतात, त्यानंतर त्या व्यक्तीने लिंगायत संप्रदाय स्वीकारला आहे, असे मानले जाते.

इष्टलिंगाची दीक्षा घेतल्यानंतर राहुल गांधी यांनी ट्विट केले की, मी भाग्यवान आहे की त्यांना इष्टलिंगाची दीक्षा मिळाली आहे आणि संत बसवण्णांबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी आणि वाचण्यासाठी खूप उत्सुक आहे.

कर्नाटकच्या निवडणुका तोंडावर 

कर्नाटकात 2023 मध्ये निवडणुका आहेत आणि लिंगायत पंथाची मोठी व्होट बँक येथे आहे. कर्नाटकात लिंगायत समाज ही भाजपची मोठी व्होट बँक आहे. यामुळे निवडणुका डोळ्यासंमोर ठेवून राहुल गांधींनी लिंगायत पंथाची दीक्षा घेतली का? असा सवाल उपस्थित केला जातोय.

श्री जगद्गुरु मुरुगराजेंद्र विद्यापीठाला भेट देणे आणि डॉ. श्री शिवमूर्ती मुरुघा शरनारू यांच्याकडून ‘इष्टलिंग दीक्षे’ प्राप्त करणे ही अत्यंत सन्मानाची गोष्ट आहे. गुरु बसवण्णांची शिकवण चिरंतन आहे आणि मठाच्या शरणारूंकडून त्याबद्दल अधिक जाणून घेण्यास मी नम्र आहे.

Sudarshan Rapatwar

महाराष्ट्रातील प्रगल्भ पत्रकार मराठवाड्यातील पत्रकारितेला एक नवा आयाम देण्याचा त्यांचा यशस्वी प्रयत्न असतो. गावातील पत्रकारिता जिल्ह्यात, राज्य आणि देश पातळीवर नेण्यात त्यांचे मोठे योगदान आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker