पूर्णवाद वर्धिष्णू विद्यासागर डॉ. विष्णू महाराज पारनेरकर यांचे आज लिंबागणेशमध्ये आगमन
![](https://madhyamnews.com/wp-content/uploads/2022/07/parnerkr-maaraj.png)
![](https://madhyamnews.com/wp-content/uploads/2022/07/parnerkr-maaraj.png)
बीड पूर्णवाद वर्धिष्णू विद्यासागर डॉ.विष्णू महाराज पारनेरकर आज रविवार १७ जुलै २०२२ रोजी बीड तालुक्यातील लिंबागणेश येथे येत असुन त्यांच्या पवित्र उपस्थीतीत येथील श्री. गणपती देवस्थान लिंबागणेश ट्रस्टचे अध्यक्ष विनायकराव जोशी यांचा सहस्त्र चंदर्शन सोहळा अाणि दिव्य मराठीचे जिल्हा प्रतिनिधी दिनेश लिंबेकर लिखीत मोरया या गणेश ग्रंथाचे प्रकाशन होणार आहे.
लिंबागणेश येथील श्री. गणपती देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष विनायकराव जोशी यांचा सहस्त्र चंद्रदर्शन सोहळा आज रविवार १७ जुलै २०२२ रोजी सायंकाळी साडेपाच ते रात्री आठ या वेळेत गावातील भालचंद्र गणपती मंदिराजवळील सभागृहात होणार आहे. त्याच बरोबर दिव्य मराठीचे जिल्हा प्रतिनिधी दिनेश लिंबेकर यांनी बीड जिल्ह्यातील २१ गणपतीच्या स्थान महात्म्यावर लिहिलेल्या मोरया या गणेश ग्रंथाचे प्रकाशन सायंकाळी साडेसहा वाजता पूर्णवाद वर्धिष्णू डॉ.विष्णू महाराज पारनेरकर व पारनेकर गुरूसेवा मंडळाचे अध्यक्ष गुणेश (दादा ) पारनेरकर यांच्या हस्ते होणार आहे. कार्यक्रमास बीड जिल्ह्यातील गुरूबंधुंनी उपस्थीत रहावे असे आवाहन चिंतामण जोशी, पंढरीनाथ कोरान्ने, हेमंत जोशी, गणेश जोशी,मंगेश जोशी,भालचंद्र गणपती मंदिराचे पुजारी श्रीकांत जोशी यांनी केले आहे. दरम्यान गणपती मंदिरात रविवार दुपारी २ ते ५ या वेळेत गणेशभक्तांसाठी महाप्रसादाची व्यवस्था करण्यात आली आहे.