महाराष्ट्र

सुदर्शन रापतवार यांना भक्त नामदेव साहित्य पुरस्कार जाहीर

४ फेब्रुवारी रोजी नांदेड येथे होणार वितरण


अंबाजोगाई येथील ज्येष्ठ पत्रकार सुदर्शन रापतवार यांना नांदेड येथील नानक साई फाऊंडेशनच्या वतीने “भक्त नामदेव साहित्य पुरस्कार २०२४” जाहीर करण्यात आला आहे. ४ फेब्रुवारी रोजी नांदेड येथे होणाऱ्या “संत नामदेव मराठी साहित्य संमेलन आणि भक्त नामदेव पुरस्कार वितरण सोहळ्यात” मान्यवरांच्या उपस्थितीत हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.


सामाजिक आणि अध्यात्मिक क्षेत्रात अग्रगण्य ठरलेल्या नांदेड येथील नानक साई फाऊंडेशन आणि महाराष्ट्र शासनाच्या साहित्य व सांस्कृतिक मंडळाच्या संयुक्त विद्यमाने ४ फेब्रुवारी रोजी श्री गुरु ग्रंथ साहिब जी भवन नांदेड येथे संत नामदेव मराठी साहित्य तथा ग्रंथ संमेलन आयोजित करण्यात आले आहे.

पंजाब येथील घुमान येथे संपन्न झालेल्या ८८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या धर्तीवर संत नामदेव महाराज यांच्या ७५४ व्या जन्मशताब्दी निमित हे संमेलन नांदेड येथील गुरुनगरीत भरविले जात आहे.


या संमेलनात संत नामदेव महाराज यांचे साहित्य व त्यांची बाणी, विचार याबाबत विचारमंथन, चर्चा, व्याख्यान, ग्रंथदिंडी, कवीसंमेलन आणि नानक साई फाऊंडेशन च्या पुरस्करांचे वितरण आदी भरगच्च कार्यक्रम होणार आहेत. २०२४ चा भक्त नामदेव साहित्य पुरस्काराचे वितरण ही याच भव्यदिव्य कार्यक्रमात होणार आहे.


सुदर्शन रापतवार हे अंबाजोगाई येथील ज्येष्ठ पत्रकार असून गेली चार दशकांपासून ते पत्रकारिता, सामाजिक आणि साहित्य सेवेशी निगडित आहेत. त्यांच्या या सर्व कामांची दखल घेऊन नानक साई फाऊंडेशनचे चेअरमन पंढरीनाथ बोकारे यांनी “भक्त नामदेव साहित्य पुरस्कार २०२४” साठी त्यांची निवड केली आहे. सुदर्शन रापतवार यांची “भक्त नामदेव साहित्य पुरस्कार” साठी निवड झाल्याबद्दल त्यांचे अनेकांनी अभिनंदन केले आहे.

Sudarshan Rapatwar

महाराष्ट्रातील प्रगल्भ पत्रकार मराठवाड्यातील पत्रकारितेला एक नवा आयाम देण्याचा त्यांचा यशस्वी प्रयत्न असतो. गावातील पत्रकारिता जिल्ह्यात, राज्य आणि देश पातळीवर नेण्यात त्यांचे मोठे योगदान आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button