डावलण्यात आलेल्या पंकजा मुंडे यांनी नव्या मंत्र्यांना दिल्या शुभेच्छा…!


नव्या मंत्रीमंडळातील समावेशात डावलण्यात आलेल्या भाजपा तील ओबीसी समाजाच्या नेत्या पंकजा मुंडे यांनी ट्विट करुन सर्व नव्या मंत्र्यांना शुभेच्छा दिल्या असून “महाराष्ट्र तुमच्या कडे अपेक्षा ठेवून पहात आहे, आपल्याकडे त्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी शुभेच्छा..!” असे म्हटले आहे.
गेल्या महिन्याभरापासून प्रलंबित असलेला राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार अखेर पार पडला आहे. राजभवनावर हा शपथविधी पार पडला. पहिल्या टप्प्यात शिंदे गट आणि भाजपाकडून प्रत्येकी नऊ अशा एकूण १८ मंत्र्यांचा मंत्रिमंडळात समावेश करण्यात आला आहे. मात्र, या विस्तारात पंकज मुंडें याना डावलण्यात आलं आहे. सर्वत्र या गोष्टीची चर्चा होत असतानाच पंकजा यांनी ट्वीट केले आहे.
मंत्रीमंडळ विस्तारापूर्वी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजपच्या संभाव्य मंत्र्यांना स्नेहभोजनाचे निमंत्रण देण्यात आले मात्र, माजी मंत्री पंकजा मुंडे यांना फोन आलेला नाही, अशी माहिती समोर आली. आणि पंकजा मुंडेच्या पत्ता कटच्या चर्चेला उधाण आले आहे.
दरम्यान, मंत्रीमंडळ विस्तार पार पडल्यानंतर पंकजा मुंडे यांनी नव्या मंत्र्यांचे ट्विट करत अभिनंदन केले आहे. ‘नवनिर्वाचित मंत्री मंडळातील सर्व मंत्री महोदय यांचे अभिनंदन…. महाराष्ट्र अपेक्षा ठेवून पाहत आहे आपल्याकडे त्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी शुभेच्छा… विकास आणि विश्वास याची जोड ठेवून तुम्ही सर्व जण काम करून महाराष्ट्र राज्याची भरभराट कराल अशी शुभकामना’ अशा आशयाचे ट्विट त्यांनी शेअर केले आहे.
नवनिर्वाचित मंत्री मंडळातील सर्व मंत्री महोदय यांचे अभिनंदन…. महाराष्ट्र अपेक्षा ठेवून पाहत आहे आपल्याकडे त्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी शुभेच्छा… विकास आणि विश्वास याची जोड ठेवून तुम्ही सर्व जण काम करून महाराष्ट्र राज्याची भरभराट कराल अशी शुभकामना 🙏🏻..
— Pankaja Gopinath Munde (@Pankajamunde) August 9, 2022
पंकजा मुंडे यांचा पत्ता विधान परिषद निवडणुकीतही कापण्यात आला होता. तसेच केंद्रीय मंत्रीमंडळातही बीडच्या खासदार प्रितम मुंडे यांना स्थान मिळाले नाही. त्यामुळे शिंदे सरकारमध्ये तरी पंकजा यांना मंत्रीपद मिळणार का असा सवाल उपस्थित करण्यात येत होता. इतर नेत्यांना फोन आल्याची चर्चा आहे. मात्र, पंकजा मुंडे यांना फोन आला नसल्याचे सांगण्यात आले.
मंत्रींमंडळ विस्तारापूर्वी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ८ ऑगस्ट रोजी रात्री “सागर” बंगल्यावर स्नेहभोजन आयोजित करण्यात आले होते. भाजपकडून कुणाकुणाला फोन गेले याची काही नावे देखील समोर आली आहेत. मात्र, त्या यादीत पंकजा मुंडेंचे नाव नसल्याचे राजकीय वर्तुळात नव्या मंत्रिमंडळात पंकजा मुंडे यांच्या नावाचा समावेश नसल्याच्या चर्चेला उधाण आलं होते.