प्रबोधन

“पद्मश्री”…. पोस्टाने पाठवा साहेब ! दिल्लीपर्यंत यायला पैसे नाहीत

(एक अफलातून सत्यकथा)

ज्यांच्या नावापुढं कधीच कुणी “श्री” लावलं नव्हतं, ज्याच्याकडे संपत्ती म्हणून काय होते तर कपड्याचे फक्त तीन जोड, तुटलेली एक रबरी चप्पल, एक जुनाट चष्मा आणि रोख 732 रुपये फक्त ! त्याला जेव्हा चक्क पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला तेव्हा त्यांनी सरकारला कळवलं की, दिल्ली पर्यंत  यायला पैसे नाहीत  “पद्मश्री”…. पोस्टाने पाठवा साहेब !

अजब आणि अफाट आहे न हे ? मी सत्यकथा सांगतोय ओडिशातील हलधर नाग या अवलियाची. कोसली भाषेत कविता लिहिणारे प्रसिद्ध कवी, कहर म्हणजे त्यांनी आजवर जितक्या कविता आणि वीस महाकाव्य लिहिली आहेत ते सर्व त्यांना तोंडपाठ आहे. आणि आता तर संभलपूर विश्वविद्यालयात त्यांच्या “हलधर ग्रंथावली – भाग -2” याचा पाठयक्रमात समावेश करण्यात आलाय. साधाच वेष, शक्यतो पांढर धोतर, गळ्यात गमछा आणि बहुतेक वेळा अनवाणी फिरणारे हलधर एक अफलातून अवलिया आहेत. हि खरे तर इंडियन आयडॉल आहेत. पण कचकड्याच्या दुनियेतील रियालिटी शो मधल्याना आपले चॅनेलवाले हिरो करतात. आयडॉल ठरवतात. खरे आयडॉल तर हलधर जी सारखे आहेत. चॅनेलवाल्याचे यांच्याकडे लक्ष कधी गेले तर याना पद्मश्री जाहीर झाल्यावर !

श्री हलधर जी याची जीवनकहाणी तुम्हालाही प्रेरणा देऊन जाईल. म्हणून तर हि पोस्ट करतोय. ते एका अत्यंत गरीब हरिजन कुटुंबातून आलेले, आईवडिलांचे निधन झाल्याने वयाच्या दहाव्याच वर्षी हलधर जी अनाथ झाले. त्यामुळे त्यांना इयत्ता तिसरीतच शाळा सोडवि लागली. पोटासाठी इतक्या लहान वयात ते ढाब्यावर खरकटी भांडी विसळण्याचे काम करू लागले. त्यानंतर एका गृहस्थाला त्याची दया आली व यांना एका शाळेच्या स्वयंपाक घरात काम मिळाले. तिथं थोडं स्थिरस्थावर आयुष्य त्यांना मिळालं.

नंतर बँकेकडून त्यांनी शंभर रुपये कर्ज घेऊन पेन – पेन्सिल – शालेय वस्तूच्या विक्रीचे छोटेसे दुकान टाकले.  आणि उदरनिर्वाह त्यातूनच भागवू लागले. आता त्यांच्यातील साहित्यिक कौशल्याबद्दल सांगतो. श्री हलधर जी यांनी  1995 च्या सुमारास स्थानिक उडिया भाषेत “राम शबरी” सारखे काही धार्मिक प्रसंग निवडून त्यावर स्फुट लिहून ते लोकांना ऐकवू लागले. भावनेने ओथंबलेले त्यांचे ते शब्द ऐकताना लोक गुंग होऊन जायचे. पाहता पाहता त्यांच्या रचना प्रचंड लोकप्रिय झाल्या. हळूहळू ती कीर्ती सर्वदूर पसरू लागली. अनेक नामांकित लेखक कवींनी त्यांची दखल घेऊन विविध वृत्तपत्रातून त्यांच्याबद्दल भरभरून लिहिले. आणि अखेर दिल्लीपर्यंत त्यांची हि कीर्ती पोचली आणि त्यांना चक्क साहित्य क्षेत्रातील योगदानाबद्दल “पद्मश्री” पुरस्कार जाहीर झाला.

Haldhar Nag
Haldhar Nag

अजून एक कहर म्हणजे स्वतः हलधर जी फक्त तिसरी पर्यत शिकलेलं पण आजमितीस पाच पोस्ट ग्रॅज्युएट  विद्यार्थी त्यांच्या साहित्यावर पीएचडी करत आहेत. त्यांच्याबद्दल इतकंच म्हणावसं वाटत की,

आप किताबो में प्रकृति को चुनते है

पद्मश्री ने, प्रकृति से किताबे चुनी है।।

भोवती अनुकूल काहीच नसतानाही यश खेचून आणणारे, दगडालाही फोडून त्यातून बाहेर उगवून येणारे हलधर जी सारख्या लोकांची चरित्रे का वाचायची ? तर आपल्यात, आपल्या पुढच्या पिढीत त्यातूनच ऊर्जा यावी. “सगळी परिस्थिती वाईट आहे. नाहीतर मी नक्कीच काहीतरी करून दाखवलं असत” अशी कारणे देऊन निराश झालेल्यासाठीच हि आजची हलधर जी याची कहाणी तुम्हांपुढे ठेवली. शेवटी मी नेहमी सांगतो तेच आज पुन्हा सांगतो,

काहीही होवो….. रडायच नाही

तर लढायच आणि लढून जिंकायचं !

पद्मश्री डॉ. हलधर नाग यांचा जन्म ३१ मार्च १९५० ला ओडिशातील बारगढ जिल्ह्यातील घेनस गावात झाला. त्यांचे कुटुंब अतिशय गरीब होते. नाग खूप लहान होते, तेव्हा त्याचे वडील वारले. कुटुंबाची आर्थिक परिस्थिती हलाखीची असल्याने त्यांना फक्त तिसरीपर्यंतच शिक्षण घेता आले. हलधर नाग यांना कविता लिहिण्याची आवड होती आणि त्यामुळे ते लवकरच देशभर प्रसिद्ध झाले. त्यांनी लिहिलेल्या कवितांवर अनेकांनी पीएचडी केली आहे. नागांच्या अनेक प्रसिद्ध कलाकृतींसह संकलित ‘हलधर ग्रंथावली’चाही विद्यापीठांच्या अभ्यासक्रमात समावेश आहे.

Team Madyam

Madhyam Network / Madhyam News #माध्यम या मराठी चॅनलवर आपलं स्वागत.महाराष्ट्रासह राष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी अगदी सोप्या शब्दांत खास आपल्या साठी

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker