दाेन वर्षांपूर्वी पायी नर्मदा परिक्रमा; दाेन वेळा बुलेटने अमरकंटक, नर्मदा परिक्रमा केली

आता गंगाेत्री उगमस्थानापासून पाणी घेऊन ज्योतिर्लिंगच्या जलाभीषेकासाठी भारत – नेपाळ बुलेट वारी
बीड शहरातील ५३ वर्षीय अविवाहित भूमीपुत्र धनंजय वांगीकर (कुलकर्णी) यांनी आई यमुनाबाई यांचे वयाच्या ७२ व्या वर्षी चारधाम दर्शन घडवून आणले. त्यानंतर स्वत: पायी नर्मदा परिक्रमा पूर्ण केली. मागील दाेन वर्षामध्ये ११ हजार किलाे मीटर अंतराची अमरकंटक,नर्मदा परिक्रमा बुलेट दूचाकीवरुन माेहिम पूर्ण केली. श्रावण महिन्यात गंगाेत्री उगमस्थानापासून पाणी घेऊन समस्थ ज्योतिर्लिंगाचे जलाभीषेक वारीस ९ ऑगस्ट २०२२ पासून प्रारंभ केला आहे. भारत आणि नेपाळ या दाेन देशामधील १५ ज्याेतील पुढील दाेन महिन्यांची ज्योतिर्लिंगाचे जलाभीषेक वारी केली जाणार आहे. अध्यात्मीक व तीर्थाटनाच्या कार्याची दखल घेत अखिल भारतीय माँ नर्मदा परिक्रमा सेवासंघाच्या महासचिवपदी धनंजय वांगीकर यांची निवड झालेली आहे.
धंनजय वांगीकर यांनी ३३ वर्षे बांधकाम व्यवसायीक म्हणून बीडसह बाहेर जिल्ह्यात काम केले. २०१९ पासून त्यांनी स्वत:च्या बुलेटवर अध्यात्मक व तीर्थाटन वारी माेहिम सुरू केली. २०२० मध्ये साडेतीन हजार किलाेमीटर अंतराची ओंकारेश्वर सात महिन्यांची दूचाकी वारी पूर्ण केली. नंतर २०२१ मध्ये नर्मदा जयंती निमित्त अमरकंठक (मध्यप्रदेश) ५ हजार किलाेमीटर दूचाकी वारी पूर्ण केली. तिसरी एप्रील २०२२ मध्ये दाेन महिन्यांची दूचाकीवारी ही नर्मदा परिक्रमा ६ हजार किलाेमीटर अंतराची पूर्ण केली. ऑगस्ट २०२२ मध्ये ज्योतिर्लिंगचे जलाभीषेक बुलेट वारीच्या प्रवासाच्या प्रारंभ बीड शहरामधील रॉयल एनफील्ड भूमी माेटार्स येथून मंगळवारी (दि. ९) केला. यावेळी बुलेट शाेरुमचे व्यवस्थापक समीर बेग यांनी धनंजय वांगीकर (कुलकर्णी) व त्यांच्या प्रवासात साेबत असलेले अभिषेक देशमाने यांचा सत्कार करुन शुभेच्छा दिल्या. जलाभीषेक प्रवास हा एकूण १५ हजार किलाे मिटर अंतराचा हाेणार अाहे. यासाठी इंधनासह इतर सरासरी दीड लाख रुपये असणार अाहे.
भारत व नेपाळ देशांमध्ये प्रवास
१५ हजार किलाे मीटर अंतराच्या प्रवासामध्ये महाराष्ट्र, मध्यमप्रदेश, राजस्थान, उत्तरप्रदेश, दिल्ली, उत्तराखंड, नेपाळ, बिहर, गुजरात, तेलंगना, आंध्रप्रदेश, कर्नाटक, तमीळनाडू हे भारत देशामधील राज्य आणि नेपाळ देशांमधून धनंजय वांगीकर यांचा बुलेट वारीचा प्रवास हाेणार आहे.
ज्योतिर्लिंगाचा जलाभीषेक
केदानाथ (उत्तराखंड), पशुपतीनाथ (नेपाळ), देवघर वैद्यनाथ (झारखंड), काशीविश्वेश्वर (वारानसी), द्वारका नागेश्वर (गुजरात), सुरटी साेमनाथ (गुजरात), महाकालेश्वर (मध्यप्रदेश), अमरकंठक (मध्यप्रदेश), घृशनेश्वर (महाराष्ट्र), ओंकारेश्वर (महाराष्ट्र), त्रंबकेश्वर (महाराष्ट्र), परळी वैद्यनाथ (महाराष्ट्र), अाैंढानागनाथ (महाराष्ट्र),श्रीशैल्यम (तेलंगना),रामेश्वर (तमीळनाडू)
शाश्वत केवळ नामस्मरण म्हणून तीर्थाटन वारी

भूतलावर व्यवहारासाठी पैसा हे साधन अाहे तसेच सर्वकाही नश्वर आहे. शाश्वत केवळ नामस्मरण (सर्व धर्मानुसार) त्यामुळे भारत देशातील विविधतेमधील एकता अनुभवने त्याचा प्रचार – प्रसारासाठी अध्यात्मात व वैकुठातील शाश्वत सत्य नामस्मरण करण्यासाठी बुलेटद्वारे तीर्थाटन वारी माेहिम सुरू केली आहे. आपल्या मृत्यूपश्चात नामस्मरण साेबत येईल असा विश्वास आहे.
– धनंजय वांगीकर, बीड.
सजीव-जाणीव-रचना / रवी उबाळे,
