महाराष्ट्र

न. प. च्या भ्रष्टाचार मुक्त प्रशासनास नंदकिशोर मुंदडा यांनी केली सुरुवात

नळ कट करण्याचे कारण सांगून कर्मचचा-याने घेतलेले ५ हजार केले परत


अंबाजोगाई नगर परिषदेचा अध्यक्ष
म्हणून पदभार स्वीकारल्यानंतर यापुढे नगर परिषदेचा कारभार भ्रष्टाचार मुक्त करु असे आश्वासन देणा-या नंदकिशोर मुंदडा यांनी दुसऱ्याच दिवशी नळ कट करण्याची धमकी देवून एका रहिवासी सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांकडून ५हजार रुपयांची रक्कम लाटणा-या कर्मचाऱ्याचा शोध घेवून त्याला पाच हजार रुपये परत करण्यास भाग पाडून आपल्या भ्रष्टाचार मुक्त कारभारास सुरुवात केली आहे.
नंदकिशोर मुंदडा यांनी अध्यक्ष पदाचा पदभार स्विकारण्यापुर्वीच नगर परिषदेच्या मुख्य प्रवेशद्वारावर एक सुचेना फलक लावून त्यावर “नागरीकांना आपल्या कोणत्याही कामासाठी कर्मचाऱ्यांना पैसे देवू नयेत व कर्मचाऱ्यांनी कोणत्याही कामासाठी पैसे मागितल्यास आपल्या वैयक्तिक दुरध्वनी क्रमांकावर फोन करुन सांगावे.” असे जाहीर आवाहन केले आहे. याच सोबत पदभार घेतल्यानंतर कर्मचाऱ्यांशी बोलतानाही त्यांनी हा संदेश दिला होता.
मात्र नगराध्यक्ष पदाचा पदभार घेतल्यानंतर दुसऱ्या दिवशीच ज्येष्ठ पत्रकार अशोक गुंजाळ यांनी पाणी पुरवठा विभागातील कर्मचाऱ्याचे सोसायटीचे नळ कनेक्शन तोडण्याचे आदेश आहेत असे पदाधिकाऱ्यांना धमकावत त्यांनी नळ जोडणु न तोडण्यासाठी ५ हजारांची रक्कम वसूल केली होती.
याबाबत ज्येष्ठ पत्रकार अशोक गुंजाळ यांनी समाज माध्यमांवर एक पोस्ट टाकून या प्रकरणाचा पर्दाफाश केला आहे. सदरील पोस्ट मध्ये ज्येष्ठ पत्रकार अशोक गुंजाळ यांनी पुढे म्हटले आहे की, “मी सध्या तथागत चौकातील थोरात हाँस्पिटलच्यापुढे ममता बिल्डिंगमधे राहतो. ही बिल्डिंग तीन मजली असून येथे २४ फ्लँटमधून ५० ते ६० रहिवासी राहतात. या बिल्डींगला स्वतंत्र डीपी आहे. चोवीस तास पाणी पुरवठा आहे. निवासी रहिवाशांची सोसायटीपण अस्तित्वात आहे. सोसायटीच्या अध्यक्ष आणि सेक्रेटरी पदाच्या दर सहा महिन्याला निवडणूका होतात. गेल्याच आठवड्यात नवीन पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली. जुन्या सचिवाने चार्ज देताना सोसायटीकडे रु.७१८०३/- अक्षरी एक्काहत्तर हजार आठशे तीन रूपये जमा असून नव्या सेक्रेटरीला चार्ज देत असल्याचे संपूर्ण ग्रुपला व्हाँटस अपग्रुपवरून कळविले. दुसऱ्याच दिवशी नव्या सेक्रेटरीने चार्ज घेताना त्यांच्या ताब्यात ६६,८०३/- अक्षरी सहासष्ट हजार आठशे तीन रूपयेच शिल्लक असल्याचे व्हाँटसअँप ग्रुपवर कळविले.
खुलासा करताना अध्यक्ष-सेक्रेटरी यांनी फोनवर सांगितले की, काल सकाळी जलसंधारण खात्याचा किंवा न.प.चा अस्लम नावाचा कर्मचारी आला आणि त्यांनी नवीन नगराध्यक्षांनी तुमच्या बिल्डींगचे नळ कनेक्शन कट करण्याचे आदेश दिल्याचे ठणकावून सांगितले.
अचानक पाणी बंद झाले तर बिल्डींगमधील रहिवाशांचे हाल होतील या सदहेतुने अध्यक्ष-सचिवांनी त्याला कनेक्शन कट करू नये म्हणून वरचेवर रू. पाच हजार नगदी देउन त्याची रवानगी केली.
मी सोसायटीचा सभासद असूनही या घटनेपासून अनभिज्ञ होतो. दोन दिवसांनी चौकशी केली असता अस्लम नावाच्या कर्मचाऱ्याला रू.पाच हजार देउन भ्रष्टाचार केल्याचे माझ्या कानावर आले. हा भ्रष्टाचार माझा स्वभाव आणि प्रक्रुतीला न पटण्यासारखा होता. मी राहतो त्या बिल्डींगमधे एखादा कर्मचारी नगराध्यक्षाचे नाव घेउन व दाब टाकून, ब्लँकमेलींग करुन पैसे नेतो ही बाब मला अस्वस्थ करत होती. खरेतर ही घटना तीन जानेवारीची. नंदुसेठनी अजुन अध्यक्षपदाचा पदभारही स्विकारला नव्हता. त्याआधीच कर्मचाऱ्यांनी त्यांच्या नावावर भ्रष्टाचार करायला सुरु केले.
काल नंदुसेठचा पदभार झाला आणि आज आपल्या नावावर कर्मचाऱ्याने पाच हजार रूपयाचा भ्रष्टाचार केल्याचे मी नंदुसेठना फोनवर निदर्शनास आणून दिले. मी फोन केला त्यावेळी नंदुसेठ कलेक्टर आँफीसमधे अत्यंत महत्वाच्या मिटींगमधे व्यस्त होते. तेव्हढ्यातही त्यांनी माझा फोन उचलला. माझे म्हणणे ऐकुन घेतले.
अर्ध्यातासाच्या आत न.प.चा ए.ओ.,जलसंधारण अधिकारी, यश कंट्रक्शनचे ईंजिनिअर , जलसंधारण व त्याभागात काम करणारा न.प.चा कर्मचारी आमच्या बिल्डींगमधे हजर झाले. बीडहून नंदुसेठने येथे कर्मचारी व अधिकारी आपल्याकडे येत असल्याचे मला कळविले.
सर्व ईतं:भूत चौकशी झाल्यानंतर चौकशीअंती अस्लम याने पैसे घेतल्याचे उघडकीस आले. मी पैसे घेतलेच नाहीत असे कर्मचाऱ्याचे रडगाणेही झाले. पण अर्ध्यातासाच्या चौकशीनंतर चौकशीला कलाटणी मिळाली. आमच्या बिल्डींगच्या वाँचमनचा फोन आला साहेब, मी पाच हजार रूपये घेतले आहेत.मी पैसे परत करतो.
या अर्ध्यातासाच्या चौकशी दरम्यान काय काय झाले आणि अचानक वाँचमनने कबूल करणे हा भाग म्हणजे न.प.कर्मचारी आता सस्पेंड होणार या एका भितीपोटी वाँचमनने मित्रत्वापोटी हे पुर्ण प्रकरण आपल्या अंगावर घेतले.
नंदुसेठ, तुम्ही पदावर आलात आणि यापुढे तुम्ही पापा मोदीच्या समर्थकांना त्रास देणार अशी गाठ कर्मचाऱ्यांनी मनाशी पक्की बांधली आहे. आपल्या नावावर पापा समर्थकांना पालीकेचे कर्मचारी त्रास देउन आपली बदनामी करणार हे नक्की आहे. याचे हे पहिले ऊदाहरण.सांभाळून.
नंदुसेठ, माझ्या तक्रारीला दाद देउन आपण कलेक्टर आँफीसला महत्वाच्या मिटींगमधे असूनही आपण मला चौकशीचे सात-आठ फोन केले. हिच तुमची नागरिकापोटी असलेली कर्तव्यनिष्ठता दिसून येते. भ्रष्टाचार्यांना आपण असेच उघडे पाडून कायदेशीर कार्यवाही करित गेलात तर अंबाजोगाई न.प.भ्रष्टाचारमुक्त होईल याची आम्हाला खात्री वाटते.
नंदुसेठ, अंबेजोगाईतील आम्ही निदर्शनास आणून दिलेल्या भ्रष्टाचाराच्या तक्रारीचे पत्रकारदिनी उच्चाटन केल्याबद्दल आपले खूप खूप आभार.”

Sudarshan Rapatwar

महाराष्ट्रातील प्रगल्भ पत्रकार मराठवाड्यातील पत्रकारितेला एक नवा आयाम देण्याचा त्यांचा यशस्वी प्रयत्न असतो. गावातील पत्रकारिता जिल्ह्यात, राज्य आणि देश पातळीवर नेण्यात त्यांचे मोठे योगदान आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button