NAAC न झालेल्या मराठवाडा विभागातील २३३ महाविद्यालयाची प्रवेश प्रक्रियेवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या कुलगुरूंनी एका परीपत्रकान्वये स्थगित केली आहे. यामध्ये बीड जिल्ह्यातील ६४ महाविद्यालयांचा समावेश आहे.
विद्यापीठाने परीपत्रकाव्दारे दिली माहिती
यासंदर्भात डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या कुलगुरूंनी दि. १७ मे २०२५ एक परीपत्रक प्रसिद्ध केले असून या परीपत्रकात पुढे असे म्हटले आहे की, उपरोक्त विषय व संदर्भानुषंगाने मा. कुलगुरू महोदयांनी दिलेल्या आदेशान्वये विद्यापीठाशी संलग्नीत सर्व महाविद्यालयांच्या प्राचार्यांना कळविण्यात येते की, मा. व्यवस्थापन परिषदेच्या २२-११-२०२४ रोजीच्या बैठकीतील मुद्दा क्रमांक ४ नुसार नॅक मूल्यांकनासाठी पात्र असलेल्या ज्या महाविद्यालयांनी अद्यापही नॅक प्रक्रिया पूर्ण केलेली नाही अशा महाविद्यालयांची प्रथम वर्षाची प्रवेश क्षमता स्थगित (शुन्य) करणेबाबत कार्यवाही करणे बाबत ठराव घेण्यात आला असून त्यानुसार या कार्यालयाचे परिपत्रक क्र. शैक्ष/संलग्न/पीबीजी/२०२४-२५/१०५०७-१६ दि.०६-१२-२०२४ नुसार सर्व महाविद्यालयांना गुगल फार्ममध्ये माहिती सादर करण्याचे कळविले होते.
प्रवेशाची क्षमता शुन्य करण्यात आली
त्यानुसार प्राप्त झालेल्या माहितीच्या अनुषंगाने दि. १३-०५-२०२५ रोजीच्या मा. अधिष्ठाता मंडळासमोर सादर करण्यात आली, सदर माहिती महाविद्यालय निहाय तपासणी केल्यानंतर परिशिष्ट अ मध्ये जोडल्याप्रमाणे जिल्हानिहाय नॅक प्रक्रिया न केलेल्या महाविद्यालयांची शैक्षणिक वर्ष २०२५-२६ करीता प्रथम वर्षाची प्रवेश क्षमता शुन्य करण्यात आली आहे.
मराठवाड्यातील २३३ तर बीड जिल्ह्यातील ६४ महाविद्यालयाचा समावेश !
सोबत प्रवेश क्षमता शुन्य करण्यात आलेल्या महाविद्यालयांची यादी सादर करण्यात आली असून या यादीत मराठवाडा विभागातील २३३ तर बीड जिल्ह्यातील ६४ महाविद्यालयांचा समावेश आहे.
संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या प्रतिलिपी
सदरील परीपत्रकाच्या प्रतिलिपी डॉ . बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ यांच्या सह स्वीय सहायक, मा. कुलगुरू महोदय यांचे कार्यालय, स्वीय सहायक, मा. प्र-कुलगुरू महोदय यांचे कार्यालय, मा. अधिष्ठाता, सर्व विद्याशाखा, मा. संचालक, परीक्षा व मूल्यमापन मंडळ, मा. वित्त व लेखाधिकारी, वित्त व लेखा विभाग, संचालक, युनिक विभाग, नोडल अधिकारी, एमकेसीएल प्राधिकरण, परीक्षा भवन, अध्यक्ष / सचिव, सर्व संलग्नीत महाविद्यालये, कक्ष अधिकारी, पात्रता विभाग, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, छत्रपती संभाजीनगर,. यांना योग्य त्या माहिती आणि कार्यवाहीस्तव देण्यात आल्या आहेत. या परीपत्रकावर उपकुलसचिव (शैक्षणिक विभाग)
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ यांची स्वाक्षरी आहे.
महाराष्ट्रातील प्रगल्भ पत्रकार मराठवाड्यातील पत्रकारितेला एक नवा आयाम देण्याचा त्यांचा यशस्वी प्रयत्न असतो. गावातील पत्रकारिता जिल्ह्यात, राज्य आणि देश पातळीवर नेण्यात त्यांचे मोठे योगदान आहे.