‘मारुती’च्या कार स्वस्तात खरेदी करण्याची संधी
Maruti Cars Discounts July 2022 : या ऑफर्स कंपनीच्या Alto, Celerio, Swift, Wagon R आणि S-Presso हॅचबॅकवर उपलब्ध आहेत. मात्र, CNG मॉडेलवर कोणतीही सूट दिली जात नाही.


मारुती सुझुकी या महिन्यात आपल्या अरिना रेंज मॉडेल्सवर २५,००० रुपयापर्यंत सूट देत आहे. ऑफर्समध्ये कॅश डिस्काउंट, एक्सचेंज बोनस आणि कॉर्पोरेट सूट समाविष्ट आहे. या ऑफर्स कंपनीच्या – Jto, Celerio Swift, Wagon R आणि S-Presso हॅचबॅकवर उपलब्ध आहेत. मात्र, CNG मॉडेलवर कोणतीही सूट दिली जात नाही.
याचबरोबर, Ertiga फेसलिफ्ट बात बर कोणतीही सूट लागू नाही. तर वेगवेगळ्या मांडल्सवर वेगवेगळ्या ऑफर्स आहेत. Maruti Suzuki Celerio आणि Maruti Suzuki Wagon R वर २५,००० रुपयांपर्यंत ऑफर्स आहेत. Celerio अनेक व्हेरिएंटमध्ये उपलब्ध आहे. या सर्वांमध्ये १० लिटर K10C (67hp) पेट्रोल इंजिन मिळत आहे. तसेच, थरसेप ठ मध्ये दोन इंजिन ऑप्शन १.० लीटर पेट्रोल आणि १.२ लीटर K12C Duallet पेट्रोल इंजिन उपलब्धआहे.
शिवाय मारुती सुझुकी१८,००० आहेत. स्विफ्ट आपल्या किफायतशीर इंजिन, राइड आणि हँडलिंग बॅलन्ससाठी ओळखली जाते. यात १.२ लीटर पेट्रोल इंजिन (90hp) मिळते, जे ५-स्पीड मॅन्युअल किया चढ़ गिअरबॉक्सशी जोडलेले आहे. तसेच, मारुती सुझुकी ऑल्टो ८०० वर २३,००० रुपयांपर्यंत ऑफर्स उपलब्ध आहेत. ऑल्टो फक्त ७९६ इंजिनसह येते.मारुती सुझुकी एशले र २०,००० रुपयांपर्यंतच्या ऑफर्स मिळत आहेत. मारुती सुझुकीच्या परवडणान्या चात एशले मध्ये १.२ लिटर इंजिन (73hp. 98Nm) युनिट उपलब्ध आहे. हे ५ सीटर, ७-सीटर आणि कार्गो केरिएंटमध्ये उपलब्ध आहे आणि या सर्व व्हेरिएंटवर २०,००० रुपयांपर्यंत सूट आहे. याशिवाय मारुती सुझुकी डिझायरवर १५,००० रुपयांपर्यंतच्या ऑफर्स उपलब्ध आहेत.
मारुती सुझुकी डिझायर ही भारतातील सर्वाधिक विकली जाणारी कॉम्पैक्ट सेडान कार आहे. ही मारुती स्विफ्टवर आधारित सेडान आहे. मारुती सुझुकी S-Presso वर तुम्ही २०,००० बचत करू शकता. यात १.० लिटर इंजिन (68hp) आहे. S Presso च्या सर्व व्हेरिएंटवर २०,००० रुपयांपर्यंतचे फायदे उपलब्ध आहेत. दरम्यान, आम्ही तुम्हाला याठिकाणी पुन्हा एकदा सांगतो की, कोणत्याही कारच्या उछा व्हेरिएंटवर ऑफर्स नाहीत.