राष्ट्रीय

महाराष्ट्र आत्महत्येत अव्वल; तामिळनाडू दुसऱ्या क्रमांकावर!

Maharashtra tops in suicides; Tamil Nadu ranked second!

देशाची आर्थिक राजधानी असलेल्या महाराष्ट्रात सर्वाधिक आत्महत्या झाल्या असल्याच धक्‍कादायक नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोच्या अहवालातून पुढे आलं आहे. तामिळनाडू दुसऱ्या क्रमांकावर आहे.

संपूर्ण देशात2021मध्ये एक लाख 64 हजार 33 लोकांनी आत्महत्या केल्या. यातील सर्वाधिक 22 हजार 207 आत्महत्या महाराष्ट्रात झाल्या आहेत. यापाठोपाठ तामिळनाडू (18925) दुसऱ्या क्रमांकावर असून मध्यप्रदेशात 14965 आत्महत्यांच्या घटना घडल्या आहेत.
नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोच्या अहवालानुसार, भारतात आत्महत्यांच्या घटनात वाढ होत असल्याचं दिसून येतं आहे. 2021मध्ये संपूर्ण देशात आत्महत्यांच्या 1,64,033 घटना घडल्या होत्या. त्यापूर्वी, 2020मध्ये 1,53,052 आत्महत्या झाल्या होत्या. 2021मध्ये 2020च्या तुलनेत 7.2 टक्‍क्‍यांची वाढ झाली आहे.सर्वात महत्वाची बाब म्हणजे, देशाची आर्थिक राजधानी असलेल्या महाराष्ट्रात आत्महत्यांची आकडेवारी सर्वात जास्त आहे. याबाबतीत महाराष्ट्र देशात पहिल्या क्रमांकावर आहे. दुसऱ्या क्रमांकावर तामिळनाडू आणि तिसऱ्या क्रमांकावर मध्यप्रदेश आहे. पश्‍चिम बंगालमध्ये 13,500 आणि कर्नाटकात 13,056 आत्महत्या झाल्या आहेत.केंद्रशासित प्रदेशांचा विचार केल्यास दिल्ली आत्महत्यांच्या बाबतीत पहिल्या क्रमांकावर आहे. दिल्लीत 2840 आत्महत्या झाल्या आहेत. पुद्दुचेरीमध्ये 504 आत्महत्यांची नोंद झाली आहे. देशातील 53 मोठ्या शहरांमध्ये एकूण 25,891 आत्महत्या झाल्या आहेत. अंदमान आणि निकोबार बेटांवर सर्वाधिक आत्महत्या (39.7) झाल्याची नोंद आहे. त्यापाठोपाठ सिक्कीम (39.2), पुडुचेरी (31.8), तेलंगणा (26.9) आणि केरळ (26.9) यांचा क्रमांक लागतो.

बेरोजगारी, नोकरी गमाविणे, एकाकीपणाची भावना, अत्याचार, हिंसाचार, कौटुंबिक समस्या, मानसिक विकार, दारूचे व्यसन, आर्थिक नुकसान आणि वृद्धापकाळ या कारणांमुळे आत्महत्या होत आहे. तर वेदना हे आत्महत्येचे मुख्य कारण असल्याचे एनसीआरबीने म्हटले आहे.
एनसीआरबीच्या अहवालानुसार, देशभरातील एकूण आत्महत्यांपैकी 50.4 टक्के आत्महत्या या पाच राज्यांमध्ये होतात. उर्वरित 49.6 टक्के आत्महत्या 23 राज्ये आणि आठ केंद्रशासित प्रदेशांमध्ये झाल्या आहेत. दरम्यान, देशातील सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या उत्तर प्रदेशात आत्महत्यांचे प्रमाण घटले आहे. यूपीमध्ये, ही टक्केवारी देशातील आत्महत्या प्रकरणांपैकी केवळ 3.6 टक्के आहे. विशेष म्हणजे, यूपीची लोकसंख्या देशाच्या लोकसंख्येच्या 16.9 टक्के आहे.

Sudarshan Rapatwar

महाराष्ट्रातील प्रगल्भ पत्रकार मराठवाड्यातील पत्रकारितेला एक नवा आयाम देण्याचा त्यांचा यशस्वी प्रयत्न असतो. गावातील पत्रकारिता जिल्ह्यात, राज्य आणि देश पातळीवर नेण्यात त्यांचे मोठे योगदान आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker