Sanjay Raut Tweet : ‘कब तक छिपोगे गुवाहाटी में, आना ही पडेगा… चौपाटी में.. संजय राऊतांच खोचक ट्विट


‘कब तक छिपोगे गुवाहाटी में, आना ही पडेगा.. चौपाटी में.. अस खोचक ट्विट शिवसेना खासदार संजय राऊत यांनी ट्विट केले आहे. या ट्विटमध्ये त्यांनी विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांचा खास शैलीतला फोटोसुध्दा शेअर केला आहे. (Sanjay Raut Tweet)
Maharashtra Political Crisis Sanjay Raut Tweet : महाराष्ट्राच्या राजकारणात एकनाथ शिंदेंच्या बंडानंतर आता अभूतपूर्व परिस्थिती निर्माण झाली आहे. आज या सत्तासंघर्षाचा सहावा दिवस आहे. या दरम्यान शिवसेनेचे खासदार संजय राऊत मात्र सकाळी उठल्याबरोबर एखादं ट्वीट करत आपल्या विरोधकांवर टीका करण्याची संधी सोडत नाहीयेत. आज देखील संजय राऊत यांनी सकाळी सकाळी एक भन्नाट ट्वीट केलं आहे. ‘कब तक छिपोगे गुवाहाटी में, आना ही पडेगा.. चौपाटी में.. असं म्हणत त्यांनी विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांचा फोटो टाकत ट्वीट केलं आहे.
Sanjay Raut Tweet : ‘कब तक छिपोगे…
विधानसभेच्या निवडणूकानंतर शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी बंंड पुकारल्यानंतर महाराष्ट्रातील राजकारण चांगलेच रंगले आहे. गेले सहा दिवस महाराष्ट्राच्या राजकारणाला नाट्यमयरित्या वळण येत आहे. आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी सुरु आहेत. आज सकाळी सकाळी शिवसेना खासदार यांनी एक ट्विट केले आहे. या खोचक ट्विटची चर्चा सोशल मीडियावर सुरु आहे. त्यांनी ट्विटमध्ये लिहले आहे की, ‘कब तक छिपोगे गुवाहाटी में, आना ही पडेगा.. चौपाटी में.. आणि या फोटोमध्ये त्यांनी विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी कमरेवर हात ठेवलेला आणि पांढरी टोपी घातलेला खास शैलीतला फोटो शेअर केला आहे. हे ट्विट करत त्यांनी एकप्रकारे बंडखोरांना मुंबईत येण्याचे आवाहन केले आहे. या ट्विट बरोबरच नरहरी झिरवळ यांच्या फोटोचीही चर्चा सोशल मीडियावर सुरु आहे.
कब तक छीपोगे गोहातीमे..
आना हि पडेगा.. चौपाटीमे.. pic.twitter.com/tu4HcBySSO— Sanjay Raut (@rautsanjay61) June 26, 2022
तर एकीकडे बंड पुरारलेल्या एकनाथ शिंदे यांनी सुध्दा एक ट्विट करत शिवसैनिकांना आवाहन केले आहे. यामध्ये त्यांनी लिहल आहे की, प्रिय शिवसैनिकांनो, नीट समजून घ्या, म.वि.आ. चा खेळ ओळखा..! महाविकास आघाडीच्या अजगराच्या विळख्यातून शिवसेना व शिवसैनिकांना सोडवण्यासाठीच मी लढत आहे. हा लढा तुम्हा शिवसैनिकांच्या हिताकरीता समर्पित आहे. आपला एकनाथ संभाजी शिंदे.