Maharashtra Kabaddi Association: दगडु चव्हाण व दिनेश हजारी यांना राज्य कबड्डी असोसिएशनचे पुरस्कार
१५ जुलै रोजी पुणे येथे होणार वितरण
![](https://madhyamnews.com/wp-content/uploads/2022/07/DH-DC.png)
![](https://madhyamnews.com/wp-content/uploads/2022/07/DH-DC.png)
महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनच्या वतीने कब्बडी दीन समारोहानिमित्त जाहीर करण्यात येणारे पुरस्कार बीड जिल्ह्यातील ज्येष्ठ कब्बडीपटू दगडु चव्हाण (अंबाजोगाई) व दिनेश सिंह हजारी (धारुर) यांना जाहीर झाले असून १५ जुलै रोजी बालेवाडी (पुणे) येथे होणा-या एका विशेष कार्यक्रमात हे पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत.
महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनच्या वतीने दरवर्षी कब्बडी क्षेत्रात कार्यरत असलेल्या व उल्लेखनीय कामगिरी केलेल्या नवोदीत व ज्येष्ठ खेळाडुंना विविध पुरस्कार देवून सन्मानित करण्यात येते. यावर्षी चे कब्बडी असोसिएशनच्या वतीने देण्यात येणारे जाहीर झाले असून अंबाजोगाई येथील ज्येष्ठ कब्बडीपटू दगडु चव्हाण यांना ज्येष्ठ कार्यकर्ता पुरस्कार तर धारुर येथील ज्येष्ठ कब्बडीपटू दिनेश सिंह हजारी यांना ज्येष्ठ खेळाढु पुरस्कार देवून गौरविण्यात येणार आहे.
१५ जुलै रोजी बालेवाडी (पुणे) येथे २१ व्या कब्बडी दिन समारोहात मान्यवरांच्या हस्ते हे पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत. शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ व अमृत कलश असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. सदरील पुरस्कार मिळाल्याबद्दल दगडु चव्हाण व दिनेश सिंह हजारी यांचे बीड जिल्ह्यातील अनेक मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.