लातूर

लातुर मध्ये २००० विद्यार्थ्यांनी अचानक रस्त्यावर उतरून आंदोलन केले.

शिक्षणासाठी लातुर मध्ये आलेल्या विद्यार्थ्यांनी आपल्या दोन वेळच्या जेवणासाठी लावलेल्या मेस चालकांनी आपल्या दरात अचानक दरवाढ केल्यामुळे शिक्षणासाठी आलेल्या २००० विद्यार्थ्यांनी अचानक रस्त्यावर उतरून आंदोलन केले. लातूरमध्ये अचानक २ हजार विद्यार्थी रस्त्यावर उतरल्यामुळे पोलिसांचा फौजफाटा गोळा होताच विद्यार्थ्यांची पळापळ सुरु झाली. लातूरमध्ये अचानक शेकडो विद्यार्थी रस्त्यावर उतरल्याने प्रशासनाची तारांबळ उडाली. विशेष म्हणजे याची खबरबात प्रशासनालाही नव्हती. अखेर पोलिसांचा फौजफाटा दाखल होताच विद्यार्थी पळाले.

लातूर हा शिक्षणाचा पॅटर्न म्हणून राज्यभरात ओळखला जातो. त्यामुळे लातूरमध्ये मोठ्या प्रमाणात विद्यार्थी शिक्षणासाठी येत असतात. यामुळे लातूरच्या आर्थकरणाला गती मिळाली आहे. मात्र मेस चालकांनी अचानक ५०० ते ६०० रूपयांनी दर वाढल्याने ( Latur Mess Rate ) विद्यार्थ्यांना ते परवडत नाहीए. यामुळे विद्यार्थ्यां आक्रमक झाले आहेत.

शहरातील दयानंद कॉलेज समोर जवळपास २ हजार विद्यार्थी आज एकत्र आले. त्यांनी रस्त्यावर उतरून घोषणाबाजी सुरू केली. प्रशासनाला याची कोणतीच माहीती नसल्याने प्रशासनाची अचानक पळापळ सुरू झाली. हा विद्यार्थ्यांचा मोर्चा तहसीलदार कार्यालयावर आला. मोर्चेकरी आक्रमक झाल्याने मोठ्या प्रमाणात शहरातील पोलीसांचा फौजफाटा बोलावण्यात आला. हे पाहून विद्यार्थ्यांनी त्या ठिकाणाहून पळ काढला. त्यानंतर पोलिसांनी आठ ते दहा विद्यार्थ्यांची तहसील कार्यालयातच चौकशी सुरू केली आहे. घटनास्थळी पोलिस अधीक्षक निखिल पिगळे यांच्यासह प्रशासन या घटनेवर लक्ष ठेवून आहेत.

विद्यार्थ्यांनी मेसचे दर कमी करण्यासाठी तहसीलदारांना दिले निवेदन

दरम्यान, तहसील कार्यालयामध्ये तहसीलदार, पोलीस अधीक्षक, जिल्हाधिकारी पोहोचले. विद्यार्थ्यांच्या शिष्टमंडळासोबत चर्चा करून त्यांची अडचण अधिकाऱ्यांनी समजून घेतली आणि शहरातील मेस (खानावळ) चालक संघटनेला बोलावून घेत भोजन दर कमी करण्याच्या सूचना केल्या. मात्र वाढत्या महागाईमुळे दर वाढविण्यात आले असल्याचे संघटनेच्या वतीने सांगण्यात आले. अखेर सामोपचाराने प्रश्न मिटवत दर कमी करण्याचे संघटनेने मान्य केले. शिवाय आज सकाळपासून बंद असलेल्या मेस सुरू करण्यासही होकार दिला. दरम्यान, चारपर्यंत मेस सुरू झालेल्या नव्हत्या.

मासिक दर – २ हजार ४०० रुपये

एक वेळासाठी – १ हजार ५०० रुपये

राईस प्लेट – ८० रुपये

चपाती भाजी प्लेट – ७० रुपये

वरण भात – ५० रुपये

कोणतीही भाजी – ३० रुपये

राईस – ३० रुपये

एक चपाती – १० रुपये

Team Madyam

Madhyam Network / Madhyam News #माध्यम या मराठी चॅनलवर आपलं स्वागत.महाराष्ट्रासह राष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी अगदी सोप्या शब्दांत खास आपल्या साठी

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker