Laal Singh Chaddha: आमिर खान आणि करीना कपूरचे मनाला भावणारे गाणे ‘मैं की करण’


आमिर खान स्टारर ‘लाल सिंग चड्ढा’च्या निर्मात्यांनी ‘मैं की करण’ या अल्पावधी अत्यंत लोकप्रिय आणि मनाला भावणाऱ्या गाण्याचा व्हिडिओ रिलीज केला आहे.
‘लाल सिंग चड्ढा’ चित्रपटाच्या निर्मात्यांनी त्यांच्या अत्यंत लोकप्रिय गाण्याचे ‘मैं की करण’ व्हिडीओ गाणे रिलीज केले आहे जे निरागसपने निष्पाप प्रेमाचे वर्णन करते आणि व्हिडिओ अत्यंत सुंदर प्रकारे चित्रित केला आहे.
व्हिडिओमध्ये एक तरुण लाल सिंग आणि त्याच्ये निरागस रूप दर्शविते, त्यात तो अतिशय निरागसपणे बालपणीच्या प्रणयरम्य कलनाचे सादरीकरण करतो जे या गाण्याच्या सुरांप्रमाणेच तुमचे हृदय वितळवेल.
https://twitter.com/TSeries/status/1554747967499685890?s=20&t=oIGToUUVCkXqtuDzZGm0kg
त्यांच्या याआधी ‘कहानी’, ‘मैं की करण’ आणि ‘फिर ना ऐसे रात आयेगी’ या त्यांच्या तीन गाण्यांमध्ये पाहिल्याप्रमाणे, अशाच प्रकारच्या स्वरूपाचे अनुसरण करून, निर्मात्यांनी सुरुवातीला व्हिडिओशिवाय गाणी रिलीज केली होती, गीतकार, संगीतकार,आणि तंत्रध्यानाची साथ केंद्रस्थानी आहे. चित्रपटातील गाणी आधीच चार्टबस्टर बनली आहेत, ज्यामुळे चित्रपटाचा संगीत अल्बम खूप यशस्वी झाला आहे. या अप्रतिम गाण्याचे संगीत प्रीतमने केले आहे. तितकेच सुंदर गीत अमिताभ भट्टाचार्य यांनी लिहिले आहे आणि गायक सोनू निगम आणि रोमी यांनी त्यासाठी गायन दिले आहे.
आमिर खान प्रॉडक्शन, किरण राव आणि वायकॉम18 स्टुडिओज निर्मित ‘लाल सिंग चड्ढा’ मध्ये करीना कपूर खान, मोना सिंग आणि चैतन्य अक्किनेनी यांच्याही भूमिका आहेत. हा फॉरेस्ट गंपचा अधिकृत रिमेक आहे. हा चित्रपट 11 ऑगस्ट 2022 रोजी प्रदर्शित होणार आहे.