औरंगाबाद

जायकवाडी धरण ओव्हरफ्लो; १० दरवाज्यातुन पाण्याचा विसर्ग सुरू

पैठण / जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांच्या उपस्थितीत आज सायं ६:१५ वाजता जायकवाडी धरणाच्या २७ दरवाजांपैकी १० दरवाजे उघडण्यात आले. पैठण येथील जायकवाडी प्रकल्पाच्या नाथसागराच्या पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस सुरु आहे. त्यामुळे नाथसागरात पाण्याची आवक वाढण्याचे प्रमाण वाढले असुन सोमवारी सायंकाळी जवळपास ३० हजार क्युसेक पाणी येत होते. यामुळे धरणात ९० टक्के पेक्षा अधिक पाणी साठा वाढला आहे. यामुळे धरण प्रशासन व तालुका पशासनाची यंत्रणा सतर्क झाली आहे.

जायकवाडी पाटबंधारे विभागाचे धरण नियंत्रण कक्षेतुन कार्यकारी धरण जवळपास १०० टक्के भरले असल्यामुळे सायंकाळी ६:१५ वाजता धरणाच्या २७ दरवाजापैकी १० दरवाजांमधुन गोदावरीच्या पात्रात पाण्याचा विसर्ग करण्यात आला. धरणाच्या वरील भागातील प्रमुख १७ धरणे ओव्हरफ्लो झाली असल्यामुळे हे पाणी नाथसागरात येणार असल्यामुळे यंदा धरण भरणार असल्याचा अंदाज जलसंपदा विभागाच्या सुत्रांनी व्यक्त केला होता. नाशिक जिल्ह्यात होत असलेल्या अतिवृष्टीमुळे गोदावरी नदी तुडुंब भरुन वाहत असुन पुरसदृश परिस्थिती  निर्माण झाली आहे.

त्यामुळे या पुराचे पाणी नाथसागरात दाखल होत असल्यामुळे धरणाच्या पाणीसाठ्यात मोठी वाढ होवुन धरण शंभर टक्के भरले आहे. धरणाच्या वरील भागातील १७ धरणाने शंभरी गाठल्याने गोदावरी दुथडी वाहु लागल्याने नाथसागर तुडुंब भरले आहे.

प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार धरणाच्या वरील भागातील एकुण १७ प्रमुख धरणाची पाणी पातळीही जवळपास १००% टक्केजवळ पोहंचली आहे. त्यामुळे या धरणातुन नाथसागरात पाणी येत आहे. या प्रमुख धरणात सोमवारचा पाणीसाठा करंजवन ८१% वाघाड, १००% ओझरखेड, १००% पालखेड ५२, गंगापूर, ६७%गौतमी,८२% कश्यपी, ८८% दारणा, ७०%भावली, १००% नागमठाण, भंडारदरा, ८९% निळवंडे,८१,वालदेवी १००% आदी प्रमुख धरणांचा समावेश आहे.

जलविद्युत केंद्रामधून १५८९ क्युसेकचा विसर्ग

जायकवाडी जलविद्युत केंद्रातून १९ रोजी सायंकाळी ७ वाजता १५८९ क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. गोदावरी नदीकाठच्या सर्व गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला असून, पुढील दोन दिवसांत दरवाजे उघडल्यास अतिसतर्कतेच्या सूचना आहेत.

चार दिवसांत वाढले २० टक्के पाणी

दि. १५ जुलै रोजी धरण ५८ टक्क्यांवर होते. १९ जुलैच्या सायंकाळी धरणात ७९ टक्क्यांपर्यंत पाणी आले. चार दिवसांत २० टक्के पाणी धरणात वाढले. १९ रोजी धरणात १६९६.४७३ दशलक्ष घनमीटर जिवंत जलसाठा असल्याची नोंद झाली. धरणाची पूर्ण क्षमता २१७० दशलक्ष घनमीटर आहे. धरणात ५१ हजार ७२१ क्युसेक पाण्याची आवक सुरू होती.

Team Madyam

Madhyam Network / Madhyam News #माध्यम या मराठी चॅनलवर आपलं स्वागत.महाराष्ट्रासह राष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी अगदी सोप्या शब्दांत खास आपल्या साठी

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker