“महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना 2019-2022अंतर्गत प्रोत्साहनपर लाभ योजना”
What is Mahatma Jyotirao Phule Loan Waiver 2022 Scheme for farmers

लातूर / लातूर जिल्ह्यातील सर्व शेतकरी यांना कळविण्यात येते की, महाराष्ट्र शासनाने शासन निर्णय दिनांक 29 जुलै 2022 अन्वये महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना 2019 अंतर्गत अल्पमुदत पीक कर्जाची नियमितपणे परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना रुपये 50 हजारांपर्यत प्रोत्साहनपर लाभ देण्याच्या योजनेस मान्यता दिलेली आहे.
नियमित कर्जपरतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर लाभ देण्यासाठी सन 2017-18, 2018-19 आणि 2019-20 हा कालावधी विचारात घेण्यात येणार असुन या तीन आर्थिक वर्षापैकी कोणत्याही दोन आर्थिक वर्षात पीक कर्जाची उचल करुन नियमित परतफेड केलेल्या शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ देण्यात येणार आहे.
सदर योजनेची अंमलबजावणी सुरु करण्यात आलेली आहे. योजना पुर्णत: ऑनलाईन पध्दतीने राबविली जाणार असून आधार क्रमांकानुसार यादया तयार करुन त्याचे लेखापरिक्षण करुन घेणार आहे.या लेखापरिक्षण झालेल्या यादया महा-आयटीमार्फत विकसीत संगणकीय प्रणालीवर अपलोड करावयाच्या आहेत.
या योजने अंतर्गत ज्या पात्र शेतकऱ्यांची खाती आधार लिंक नसतील अशा शेतकऱ्यांची यादी बँक शाखा, विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेचे कार्यालय व ग्रामपंचायत कार्यालयाच्या नोटीस बोर्डावर दि. 5 सप्टेंबर 2022 पूर्वी डकवण्यात येणार आहेत. योजनेतंर्गत लाभाची रक्कम शेतकऱ्यांच्या बचत खात्यावर वर्ग करण्यात येणार आहे.
तरी ज्या शेतकऱ्यांची कर्ज खाती / बचतखाती आधार लिंक नसतील अशा शेतकऱ्यांनी त्यांची खाती आधार लिंक करुन घ्यावीत असे आवाहन जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी. व जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, लातूर यांनी एका प्रसिध्दी पत्रकाव्दारे केले आहे. Mahatma Jyotirao Phule Loan Waiver 2022 Scheme
काय आहे महात्मा ज्योतिराव फुले कर्जमाफी 2022 योजना?
कर्जबाजारीपणामुळे अनेक शेतकऱ्यांनी आपली जीवनयात्रा देखील संपवल्याची अनेक उदाहरणे आपल्याला दिसून आली आहे. त्यामुळे आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांची कुटुंबे उघड्यावर आली आहेत. या गोष्टीची दखल घेऊन राज्य सरकारने कर्जबाजारी शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी महाराष्ट्रात महात्मा ज्योतिराव फुले कर्जमाफी योजना सुरू केली आहे. या योजनेचा लाभ राज्यातील अल्पभूधारक शेतकऱ्यांना होत आहे. कोणत्या शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ देण्यात येणार आहे, त्यासाठीचे निकष काय आहेत, योजनेच्या लाभार्थ्यांची यादी कशी पाहायची, लाभ मिळविण्यासाठी कोणती कागदपत्रे जोडायची, अशा अनेक प्रश्नांची उत्तरे तुम्हाला या विषयाशी निगडीत लेखमालिकेतून मिळणार आहे.
महात्मा ज्योतिराव फुले कर्जमाफी लिस्ट 2022 योजनेचा तपशिल
Name महात्मा ज्योतिराव फुले कर्जमाफी 2019-2022 योजना
Launched by महाराष्ट्र सरकार
Beneficiaries महाराष्ट्रातील अल्पभूधारक शेतकरी
Objective अल्पभूधारक शेतकऱी कर्जमुक्त व्हावेत
Official website https://mjpsky.maharashtra.gov.in/
काय आहे महात्मा ज्योतिराव फुले कर्जमाफी योजना यादी 2022
राज्यात महाविकास आघाडी सरकार आल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची घोषणा केली. त्यासाठी महात्मा ज्योतिराव फुले कर्ज माफी योजना सुरू केली. या योजनेद्वारे राज्य सरकारने अल्पभूधारक शेतकऱ्यांचे दोन लाख रुपयांपर्यंतचे कर्जमाफी केले आहे. ज्या शेतकऱ्यांनी 30 सप्टेंबर 2019 पूर्वी पीक कर्ज घेतले, असे शेतकरी या योजनेस पात्र ठरले आहेत. या योजनेचा लाभ देण्यात येणार असलेल्या शेतकऱ्यांची जिल्हास्तरावर यादी जाहीर करण्यात आली आहे. ही यादी शेतकऱ्यांना ऑनलाईन पाहण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे.
शेतकऱ्यांना मिळणारा लाभ
- ३० सप्टेंबर रोजी थकीत असलेले व दि. १ एप्रिल २०१५ ते ३१ मार्च २०१९ या कालावधीत घेतलेले अल्पमुदत पीक कर्ज आणि पुनर्गठीत पीक कर्ज होणार माफ!
- कर्जमुक्तीची रक्कम राज्यशासन शेतकऱ्यांच्या कर्जखात्यात थेट भरणार!
- राष्ट्रीयकृत, व्यापारी,जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका,ग्रामीण बँका, विविध कार्यकारी सहकारी संस्था यांच्याकडून शेतकऱ्यांनी घेतलेले पीक कर्ज आणि पुनर्गठीत पीक कर्ज माफ होणार !
यांना लाभ मिळणार नाही
- आजी व माजी मंत्री, आजी व माजी आमदार आणि खासदार
- केंद्र व राज्य शासनाचे अधिकारी, कर्मचारी (मासिक २५ हजार पेक्षा जास्त वेतन असणारे) (चतुर्थश्रेणी वगळून)
- महाराष्ट्र शासनाचे अंगीकृत उपक्रमाचे अधिकारी, कर्मचारी (मासिक २५ हजार पेक्षा जास्त वेतन असणारे) (चतुर्थश्रेणी वगळून)
- सहकारी साखर कारखाने,कृषीउत्पन्न बाजार समिती, सहकारी दूध संघ, नागरी सहकारी बँका, सहकारी सूत गिरणी यांचे संचालक मंडळ व या संस्थांमध्ये मासिक २५ हजार पेक्षा जास्त वेतन असणारे अधिकारी
- २५ हजार रु. पेक्षा जास्त निवृत्तीवेतन घेण्याऱ्या व्यक्ती
- शेती उत्पन्नाव्यतिरिक्त आयकर भरणाऱ्या व्यक्ती




