न्यायालयाचा अवमान होवू नये म्हणून एच एम आय एस प्रणाली बंद
कोणताही अडथळा न येता रुग्ण सेवा सुरु; अधिष्ठाता डॉ. भास्कर खैरे
![HMIS](https://madhyamnews.com/wp-content/uploads/2022/07/hmis-1.png)
![HMIS](https://madhyamnews.com/wp-content/uploads/2022/07/hmis-1.png)
राज्यातील सर्व शासकीय वैद्यकीय महाविद्यालया मध्ये EIT कंपनीतर्फे चालु असलेली HMIS या सुविधेचा वापर दि.५.७.२०२२ च्या मध्यरात्रीपासुन बंद करण्यात आलेला आहे. त्याप्रमाणे स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, अंबाजोगाई या संस्थेत देखील HMIS प्रणालीचा वापर बंद करण्यात आलेला आहे. सदरील कंपनीतर्फे मा. न्यायालयामध्ये याचीका दाखल करण्यात आली असुन न्यायालयाचा अवमान होऊ नये म्हणुन सदरील कंपनीतर्फे पुरविण्यात येणाऱ्या HMIS प्रणालीचा वापर बंद केलेला आहे.
![DR. Bhaskar Khaire](http://madhyamnews.com/wp-content/uploads/2022/07/bhaskar-khaire.jpg)
![DR. Bhaskar Khaire](http://madhyamnews.com/wp-content/uploads/2022/07/bhaskar-khaire.jpg)
स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, अंबाजोगाई मध्ये सदरील प्रणाली चा वापर बंद करण्याअगोदर सर्व पर्यायी व्यवस्था करण्यात आलेली आहे. सर्व सेवा लिपीक वर्गीय कर्मचारी व इतर कर्मचारी यांच्या मार्फत दैनंदिन कामकाज सुरळीतपणे चालु असुन रुग्णसेवेत कोणताही अडथळा येत नसुन कोणत्याही रुग्णाची गैरसोय झालेली नाही. तसेच HMIS प्रणालीदवारे ऑनलाईन पदधतीची सेवा येत्या तीन ते चार महिन्यामध्ये कार्यान्वीत करण्यासाठी शासन स्तरावर प्रक्रीया चालु आहे. बाहयरुग्ण विभागात रुग्णनोंदणी, आंतररुग्ण नोंदणी, अपघात विभागामधील नोंदणी तसेच सर्व चिकित्सालयीन व सर्व चाचण्या करणाऱ्या विभागातील रुग्णसेवा सुरळीतपणे चालु आहे. ऑपरेशन थियटर सुदधा सुरळीतपणे चालु आहेत. सदरील ऑनलाईन प्रणाली बंद झालयामुळे कुठल्याही रुग्णाची शस्त्रक्रीया लांबवण्यात आलेली नाही किंवा रद्य करण्यात आलेली नाही सर्व विभागामधील शस्त्रक्रिया ( इमर्जन्सी/रुटीन) सुरळीतपणे चालु आहेत.
सदरील ऑनलाईन प्रणाली बंद झाल्यामुळे अद्याप कोणत्याही रुग्णाकडुन अथवा रुग्णाच्या नातेवाईका कडुन रुग्णसेवेबाबत कोणतही तक्रार प्राप्त झालेली नाही.
सदरील ऑनलाईन प्रणाली बंद झाल्यामुळे रुग्णसेवेवर कोणताही परिणाम झालेला नाही. तसेच ऑनलाईन प्रणाली बंद झाल्यामुळे रुग्णसेवेवर परिणाम होत आहे अशा माध्यमादवारे येणाऱ्या बातम्यावर कोणीही विश्वास ठेवु नये असे आवाहन अधिष्ठाता, स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुगणालय, अंबाजोगाई यांच्यातर्फे करण्यात येत आहे.