बीडमहाराष्ट्र

बीड जिल्ह्यात गोगलगायीच्या प्रादूर्भावाने उगवत्या पिकांचे नुकसान

पंचनामे करून हेक्टरी ५० हजार नुकसान भरपाई द्या ; आ.धनंजय मुंडे

जिल्ह्यात पावसाने उशिरा का असेना पण दमदार हजेरी लावली असून या काळात उगवलेल्या सोयाबीन सह अन्य पिकांना गोगलगायीनी मोठ्या प्रमाणात ग्रासले आहे. जिल्ह्यातील बहुतांश भागात गोगलगायींच्या प्रादुर्भावाने उगवलेली सोयाबीन पिके पूर्णत: नष्ट झाली आहेत, तर सोयाबीन सह इतरही पिकांना गोगलगाईच्या नुकसानीचा मोठा फटका बसला असून, याबाबत कृषी व महसूल यंत्रणेने तात्काळ पंचनामे करून राज्य सरकारने संबंधित शेतकऱ्यांना हेक्टरी 50 हजार रुपये मदत जाहीर करावी, अशी मागणी माजी मंत्री तथा आमदार धनंजय मुंडे यांनी केली आहे.

 

 

बीड जिल्ह्यात पेरणीनंतर पाऊस काही काळ लांबणीवर होता, मात्र जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्याच्या शेवटी पावसाने दमदार हजेरी लावली. याच काळात बीड जिल्ह्यात पेरणी करण्यात आलेल्या प्रमुख पिकांपैकी सोयाबीनचे क्षेत्र गोगलगायींच्या भक्ष्यस्थानी पडले. शंखी व अन्य प्रकारातील गोगलगायी उगवलेली रोपटे खाऊन नष्ट करत असून, पेरणी केलेल्या शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून, कृषी विभागाने हा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शेतकऱ्यांना मार्गदर्शन कार्यशाळा आदी उपाययोजना केल्या, परंतु त्याला खूप उशीर झाला होता.

 

ऐन पेरणीच्या हंगामात तत्कालीन कृषी मंत्री सहलीवर होते व नवीन सरकारमध्ये अद्याप खातेवाटप झालेले नाही. पेरणी करून १०० टक्के नुकसान झाल्यानंतर आता गोगलगायीचे नियंत्रण करणे व दुबार पेरणी करणे असे मोठे दुहेरी संकट बीड जिल्ह्यातील बहुतांश शेतकऱ्यांच्या समोर असल्याचे धनंजय मुंडे यांनी म्हटले आहे. दरम्यान गोगलगायीमुळे नुकसान झालेल्या सोयाबीन सह इतर पिकांचे नुकसान व प्रशासन करत असलेल्या व्यवस्थापनाची धनंजय मुंडे यांनी रविवारी अंबाजोगाई तालुक्याच्या दौऱ्यावर असताना जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा, अधिकारी नम्रता चाटे आदींकडूनही माहिती घेतलीअसून कृषी व महसूल विभागाने झालेल्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करून त्याचा अहवाल राज्य शासनास कळवावा व शासनाने दुहेरी संकटात अडकलेल्या शेतकऱ्यांना हेक्टरी 50 हजार रुपये मदत जाहीर करून ती तात्काळ उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी माजी मंत्री तथा आमदार धनंजय मुंडे यांनी केली आहे.

Team Madyam

Madhyam Network / Madhyam News #माध्यम या मराठी चॅनलवर आपलं स्वागत.महाराष्ट्रासह राष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी अगदी सोप्या शब्दांत खास आपल्या साठी

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker