भाजपने राजकारणासाठी वर्षा संजय राऊत यांना ईडीचे समन्स दिले आहे का?
वर्षा राऊत यांना कशामुळे मिळाला ईडी समन्स


शिवसेनेचे प्रवक्ते खा. संजय राऊत यांना पत्राचाळ पुनर्वसन प्रकरणातील चौकशी आढळून आलेल्या कागदपत्रावरुन सक्त वसुली संचालनालयाने अटक केलेल्या प्रकरणात खा. संजय राऊत यांच्या पोलीस कोठडीत आता ८ ऑगस्ट पर्यंत वाढ झालेली असतांनाच आता या प्रकरणात त्यांच्या पत्नी वर्षा संजय राऊत यांनाही सक्त वसुली संचालनालयाने ED ने समन्स बजावले आहे. वर्षा राऊत यांना ५ ऑगस्ट रोजी सक्त वसुली संचालनालयाने हजर राहण्यासाठी समन्स बजावले आहे.
गेली अनेक वर्षांपासून गाजत असलेल्या पत्राचाळ पुनर्वसन प्रकरणात सक्त वसुली संचालनालयाने (ED) ३० जुलै रोजी रात्री खा. संजय राऊत यांना अटक केल्यानंतर चार दिवसांची (४ ऑगस्ट पर्यंत)पोलीस कोठडी देण्यात आली होती. सदरील चार दिवसांची पोलीस कोठडी संपल्यानंतर आज ४ ऑगस्ट रोजी या प्रकरणात त्यांना न्यायालयासमोर हजर केले असता त्यांची कस्टडी आता ८ ऑगस्ट पर्यंत वाढवण्यात आली आहे. या प्रकरणात आता वेगवेगळे धागे दोरे समोर येत आहेत. या प्रकरणात संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांच्या खात्यावर या प्रकरणातील १ कोटी ६ लाख रुपये जमा करण्यात आल्याची कागदपत्रे सक्त वसुली संचालनालयाच्या (ED) ताब्यात आल्यानंतर आता सक्त वसुली संचालनालयाने ५ ऑगस्ट रोजी वर्षा राऊत यांना ही ED समोर उपस्थित राहण्यासंदर्भात समन्स बजावण्यात आले असल्याची माहिती हाती आली आहे.
खा. संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत या विवाहापुर्वी व नंतर कांही वर्षे शिक्षिका म्हणून काम केले आहे. पुढे संजय राऊत हे राजकारणात सक्रिय झाल्यानंतर वर्षा राऊत यांच्या संपत्तीत सातत्याने वाढ होत गेल्याचे दिसून येते. २०१६ च्या राज्यसभेच्या निवडणुकीसाठी संजय राऊत यांनी दिलेल्या शपथपत्रात आपल्या संपत्तीचा उल्लेख देतांना वर्षा राऊत यांच्या नावावर रोख रक्कम, बॅ़क खात्यातील ठेवी, कार, दागिन्यांसह एकुण २ कोटी ३० लाख रुपयांची संपत्ती असल्याचा उल्लेख केला आहे.
सध्या वर्षा संजय राऊत यांच्या नावावर पालघर, अलिबाग आणि रायगड मधील २०१० ते २०१२ या कालावधीत खरेदी केलेली भुखंड, मुंबई येथील उच्चभ्रू विभागात व्यावसायिक जमीन, फ्लॅट, २ दुकाने आणि १ कार्यालय अशी संपत्ती असल्याची माहिती सक्त वसुली संचालनालयाकडे उपलब्ध असल्याचे सांगितले जाते. सक्त वसुली संचालनालयाला मिळालेल्या या सर्व माहिती संदर्भात चौकशी करण्यासाठी सक्त वसुली संचालनालयाने वर्षा राऊत यांना हे समन्स बजावण्यात आले असल्याचे सांगितले जाते.
वर्षा राऊत यांना कशामुळे मिळाला ईडी समन्स
पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी वर्षा राऊत यांना ईडीचं समन्स बजावलं. याआधी जानेवारी महिन्यात वर्षा राऊत चौकशीसाठी ईडी कार्यालयात हजर झाल्या होत्या. यावेळी ईडी अधिकाऱ्यांनी त्यांची जवळपास साडेतीन ते चार तास चौकशी केली होती. दरम्यान सध्या संजय राऊत अटकेत आहेत. शिवसेना खासदार संजय राऊत यांना 8 ऑगस्टपर्यंत ईडीने कोठडी सुनावली आहे. राऊत यांच्या पत्नी वर्षा यांच्या खात्यावरुन झालेल्या व्यवहाराबाबत राऊत माहिती देत नसल्याचा आरोप ईडीनं कोर्टात केला. ज्यांच्याशी व्यवहार झालाय त्यांना चौकशीसाठी बोलवणार असल्याचं ईडीनं पीएमएलए कोर्टाला सांगितलं.
संजय राऊत यांच्यावर ईडीने कोणते आरोप केले?
शिवसेना खासदार संजय राऊत यांचा पत्राचाळ घोटाळ्याशी थेट संबंध असल्याचा आरोप ईडीने केला आहे. त्यांचे भाऊ प्रविण राऊत पत्राचाळ डेव्हलेपमेंट पाहत होते. त्यांना HDIL ग्रुपकडून 112 कोटी रुपये मिळाले. त्यातील 1 कोटी 6 लाख 44 हजार रुपये संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांच्या खात्यात पाठवले गेले. अलिबाग येथे याच पैशातून जमीन खरेदी करण्यात आली. राऊत परिवाराला पत्राचाळ आर्थिक गैरव्यवहारात थेट आर्थिक फायदा झाला आहे. या प्रकरणात ज्यांचं नाव सुरुवातीला समोर आलं होतं आणि ज्यांच्यावर कारवाई झाली होती ते प्रविण राऊत हे नावालाच होते, या प्रकरणातील खरे आरोपी संजय राऊत असल्याचा दावा ईडीने केला आहे.