Har Ghar Tiranga; प्रत्येकाने आपल्या घरावर तीन दिवस राष्ट्रध्वज फडकावा
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आवाहन


नवी दिल्ली / पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील जनतेला महत्त्वाचं आवाहन केलं आहे. पुढील महिन्यात १३ ऑगस्ट ते १५ ऑगस्ट असे तीन दिवस आपल्या घरांवर राष्ट्रध्वज फडकवण्याचं आवाहन नरेंद्र मोदी यांनी देशातील जनतेला केलं आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर आज एक ट्विट केले आहे. या ट्विटमध्ये त्यांनी म्हटलं की, स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून आपन ‘हर घर तिरंगा’ ही मोहीम राबवत आहोत. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव उपक्रमांतर्गत देशभरात येत्या ९ ऑगस्टपासून आठवडाभर ‘हर घर तिरंगा’ ही मोहीम राबवण्यात येणार आहे. या मोहिमेत सहभागी होऊन प्रत्येकाने आपल्या घरावर तीन दिव राष्ट्रध्वज फडकावा आणि ‘हर घर तिरंगा’ मोहिमेला बळकटी द्यावी असंही नरेंद्र मोदी यांनी म्हटलं. दरम्यान, १९४७ साली आजच्या दिवशी म्हणजेच २२ जुलै रोजी आपण तिरंग्याचा राष्ट्रध्वज म्हणून स्वीकार केल्याचंही मोदी यांनी म्हटलं आहे.
पंतप्रधानांचे जनतेला आवाहन
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर आज एक ट्विट केले आहे. या ट्विटमध्ये त्यांनी म्हटलं की, स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून आपन ‘हर घर तिरंगा’ ही मोहीम राबवत आहोत. देशातील जनतेला मी आवाहन करतो की, येत्या 13 ऑगस्ट ते 15 ऑगस्ट दरम्यान प्रत्येकाने आपल्या घरावर तिरंगा फडकवून या मोहिमेला बळकटी द्यावी. 1947 साली आजच्या दिवशी म्हणजेच 22 जुलै रोजी आपण तिरंग्याचा राष्ट्रध्वज म्हणून स्वीकार केल्याचंही मोदी यांनी म्हटलं आहे.आम्ही या प्रसंगी त्या सर्व महान स्वातंत्र्य सैनिकांचे स्मरण करतो ज्यांनी देशाला स्वातंत्र्य केले. ज्यांनी भारताच्या ध्वजाचे स्वप्न पाहिले, त्यांच्या स्वप्नातील भारत घडवण्यासाठी आम्ही वचनबद्ध आहोत. विशेष म्हणजे यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी फडकवलेल्या पहिल्या तिरंग्याचा फोटो देखील ट्विट केला आहे.
Today, 22nd July has a special relevance in our history. It was on this day in 1947 that our National Flag was adopted. Sharing some interesting nuggets from history including details of the committee associated with our Tricolour and the first Tricolour unfurled by Pandit Nehru. pic.twitter.com/qseNetQn4W
— Narendra Modi (@narendramodi) July 22, 2022
उत्तर प्रदेशमध्ये 15 ऑगस्टची सुटी रद्द
दरम्यान यंदा योगी आदित्यनाथ सरकारने मोठा निर्णय घेतला आहे.15 ऑगस्टची सुटी रद्द करण्यात आली आहे. यंदा शाळा, महाविद्यालये, सरकारी कार्यालये तसेच खासगी कार्यालयांना देखील सुटी नसणार आहे.15 ऑगस्टच्या दिवशी उत्तरप्रदेशात मोठ्याप्रमाणात स्वच्छता अभियान राबवण्यात येणार आहे.तसेच ‘हर घर तिरंगा’ मोहिमेचा एक भाग म्हणून 15 ऑगस्ट रोजी काढण्यात येणाऱ्या प्रभातफेरीमध्ये ‘रघुपती राघव राजा राम’ आणि ‘वंदे मातरम’ही गीते गावीत अशा सूचना भाजपाच्या वतीने आपल्या सर्व कार्यकर्त्यांना देण्यात आल्या आहेत.