H3N2 ने घेतला 23 वर्षीय तरुण डॉक्टराचा पहिला बळी
![](https://madhyamnews.com/wp-content/uploads/2023/03/IMG_20230310_212654.jpg)
![](https://madhyamnews.com/wp-content/uploads/2023/03/IMG_20230310_212654.jpg)
H3N2 या विषाणूची अहमदनगर जिल्ह्यात एन्ट्री झाली आहे. अहमदनगर जवळील एका खासगी वैद्यकीय महाविद्यालयात शिक्षण घेत असलेल्या 23 वर्षीय तरुणांचा इन्फ्लूएंझा (H3N2) या विषाणूची लागण झाल्याने मृत्यू झाला आहे.याबाबतची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संदीप सांगळे यांनी दिली.
![](https://madhyamnews.com/wp-content/uploads/2023/03/IMG_20230310_212605.jpg)
![](https://madhyamnews.com/wp-content/uploads/2023/03/IMG_20230310_212605.jpg)
वैद्यकीय शिक्षण घेणारा विद्यार्थी पहिला बळी
हा तरुण डॉक्टर औरंगाबाद येथील रहिवाशी असून तो नगर मधील खाजगी वैद्यकीय महाविद्यालयात शिक्षण घेत होता. गेल्या काही दिवसापूर्वी या युवकाने अनेक ठिकाणी प्रवास केला असल्याचे निदर्शनास आले आहे.
त्याच्यावर अहमदनगर शहरातील एका रूग्णालयात उपचार सुरू होते. मात्र सोमवारी रात्री 10.30 वाजता त्याचा मृत्यू झाला. H3N2 या विषामुळे घेतलेला महाराष्ट्रातील हा पहिला बळी ठरला आहे.
![](https://madhyamnews.com/wp-content/uploads/2023/03/IMG_20230310_212629.jpg)
![](https://madhyamnews.com/wp-content/uploads/2023/03/IMG_20230310_212629.jpg)
H3N2 व कोवीड दोन्ही आजाराची लक्षणे
दरम्यान, मंगळवारी दुपारी मृत्यू झालेल्या युवकाच्या रक्ताचे नमुने इन्फ्लूएंझा बाधित आले असल्याचा खासगी प्रयोग शाळेचा अहवाल मिळाला आणि अहमदनगरच्या आरोग्य खात्यात एकच खळबळ उडाली. दुसरीकडे मयत तरुणाचा कोविडचा अहवाल पॉझिटीव्ह होता. मयत तरुण मागील आठवड्यात अलिबागला पर्यटनासाठी गेला होता. तेथून अहमदनगरला आल्यावर तो आजारी पडला होता.
नागपुर मध्ये ही 78 वर्षीय वृद्धाचा संशयित मृत्यू?
नागपूर मधे (H3N2) ७८ वर्षीय वृद्धाचा संशयित मृत्यू झाल्याने आरोग्य विभागात खळबळ उडाली आहे. मात्र आरोग्य विभागाने डेथ ऑडिट झाल्यावरच या मृत्यूची नोंद करून घेणार असल्याचे स्पष्ट केले आहे. नागपूर महानगरपालिकेच्या हद्दीतील ७८ वर्षे रुग्णावर शहरातील एका खाजगी रुग्णालयामध्ये उपचार सुरू होते. रुग्णाला क्रॉनिक ऍबस्ट्रक्टिव्ह पलमोनरी डिसीज (सीओपीडी) मधुमेह, उच्च रक्तदाब यासारख्या सहव्याधी होत्या. उपचार सुरू असतानाच ९ मार्च रोजी त्याचा मृत्यू झाला. मृत्यूपूर्वी त्याची केलेली तपासणी पॉझिटिव्ह आली असल्याची माहिती मनपाच्या आरोग्य विभागाला देण्यात आली.
नागपूर विभागाचे आरोग्य उपसंचालक डॉ. विनिता जैन यांच्यानुसार या मृत्यूला सध्या तरी संशयित म्हणून पाहिले जात आहे. बुधवारी डेथ ऑडिट समिती समोर हे प्रकरण आल्यावर व त्यांनी मान्यता दिल्यावरच या मृत्यूची (H3N2) चा मृत्यू म्हणून नोंद होणार असल्याचे त्यांनी सांगितले.