कामाचे श्रेय गुरू कधीच स्वत:कडे घेत नाही तर शिष्याला देतो
मार्गदर्शन | पूर्णाचार्य गुणेशदादा पारनेरकर यांचे लिंबागणेश येथे प्रतिपादन
पत्रकार दिनेश लिंबेकर यांच्या मोरया गणेश ग्रंथाचे शानदार प्रकाशन
गुरूचे वैशिष्ट्य असे असते की तो काम शिष्यालाच करायला लावतो व त्याचे फळही शिष्याला देतो. झालेल्या कामाचे श्रेय गुरू कधीच स्वत:कडे घेत नाही तर ते श्रेय देव आणि शिष्याला देत असतात. जो श्रेष्ठ पदाला पोहोचतो, त्याचेच सहस्त्रचंद्रदर्शन केवळ ज्येष्ठ झाल्याने होत नाही तर श्रेष्ठ झाल्याने होते. म्हणून सूर्य जर आयुष्य देणारा असेल तर चंद्र हा आयुष्य वर्धमान करणारा आहे, असे प्रतिपादन पूर्णाचार्य गुणेश दादा पारनेरकर यांनी केले.
बीड तालुक्यातील लिंबागणेश येथे भालचंद्र गणपती मंदिर सभागृहात रविवारी (ता.१७ जुलै) संध्याकाळी येथील गणपती देवस्थानचे ट्रस्टचे अध्यक्ष विनायकराव जोशी यांचा सहस्त्रचंद्रदर्शन सोहळा, दैनिक दिव्य मराठीचे ब्युरो चीफ दिनेश लिंबेकर लिखित ‘मोरया’ व पुजारी वरद जोशी लिखित ‘अखिल विश्वाचे दैवत श्री भालचंद्र’ या दाेन्ही गणेश ग्रंथाच्या प्रकाशन प्रसंगी पूर्णाचार्य गुणेशदादा पारनेरकर बोलत होते. व्यासपीठावर पूर्णाचार्य आनंदराव मुठाळ, भालचंद्र गणपती देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष विनायकराव जोशी यांची प्रमुख उपस्थिती होती. पुढे बोलताना गुणेशदादा पारनेरकर म्हणाले, स्वामीनिष्ठेच्या बळावर छत्रपती शिवाजी महाराजांनी देशाचे स्वरूप बदलून टाकले. तसेच पूर्णवाद प्रणेते डॉ.रामचंद्र महाराज पारनेरकर यांनीही गुरूनिष्ठा या विषयाला महत्व देऊन स्वराज्याचे सुराज्य करण्याचा संकल्प केला. डॉ.पारनेकर महाराजांना जी माणसे मिळाली ती देवाने जन्माला घातली की त्यांनी ती माणसे तयार केली? असा प्रश्न माझ्यापुढे निर्माण होतो. छत्रपती शिवरायांच्या दरबारात जशी नवरत्ने होती, तशी डॉ.पारनेरकर महाराजांच्या दरबारातही होती. त्यातील एक रत्न म्हणजे विनायकराव जोशी होय. त्यांनी केलेले कार्य व कर्तव्य मोठे असून कर्तव्यपरायणता हा गुण त्यांच्याकडून शिकावा, असेही त्यांनी सांगितले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जगदीश शिरापूरकर, प्रास्तविक रामनाथबुवा अय्यर यांनी केले तर वेदमंत्र पठण बबनदेव गुरूजी यांनी केले. यावेळी चिंतामण जोशी, हेमंत जोशी, मंगेश जोशी, युगंधरा जोशी, सविता जोशी आदींची उपस्थिती होती. भालचंद्र गणपती देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष विनायकराव जोशी यांच्या सहस्त्रचंद्रदर्शन सोहळ्यानिमित्त शंभर दिव्यांनी त्यांचे औक्षण करण्यात आले. पूर्णवाद व गणेशग्रंथांनी त्यांची तुला करण्यात आली तर त्यांच्या पत्नींची गुरूतुला करण्यात आली.
यांचा विशेष सत्कार
या कार्यक्रमात भालचंद्र गणेश मंदिराचे व्यवस्थापन पाहणारे सुंदरराव वाणी, अशोक कुलकर्णी, पुजारी श्रीकांत जोशी, सामाजिक कार्यकर्ते डॉ.गणेश ढवळे, धोंडोपंत नाईक, विनायकराव वझे, पंढरीनाथ कोराने, गणेशराव जहागीरदार, जेष्ठ पत्रकार जगदीशराव पिंगळे यांचा सत्कार गुणेशदादा पारनेरकर यांच्या हस्ते करण्यात आला तर बीड येथील पत्रकार जितेंद्र सिरसाट, दिव्य मराठीचे वितरक अमित सासवडे यांनी गुणेशदादा पारनेरकर यांचा सत्कार केला.
गुरू आणि गणेश याचे दर्शन
पूर्णाचार्य गुणेशदादा पारनेरकर म्हणाले, दिनेश लिंबेकर यांनी लिहिलेल्या मोरया गणेश ग्रंथातून केवळ गणेशाचेच नाही तर गुरू व गणेश या दोघांचेही दर्शन होत आहे. बीड जिल्ह्यातील २१ गणपतींसह अन्य वैशिष्ट्यपूर्ण गणपती या ग्रंथात असल्याने गणेश परंपरेपर प्रथमच प्रकाश पडत आहे.
प्रभाग क्रमांक १९ माऊलीनगर
नाळवंडी नाका ते पाण्याची टाकी पर्यंत एक किलो मिटर शहरी रस्ता खराब आहे. माऊलीनगर येथील अंतर्गत रस्ते खराब, पक्के झाले नाहीत शेतातील चिखल रस्त्यावर असतो, वाहने चालत नाही. आठशे लोकसंख्या आहे. या पूर्णपणे रस्ता खराब नाळवंडी नाका – बलभीमनगर या रस्ता खराब आहे. या मार्गावरून ये जा करावी लागते सध्या या मार्गावर मुरूम १४ जुलै २०२२ रोजी नगर पालिकेने मुरूम टाकला आहे रोलरने अंथरला नाही. नाळवंडी रोडवर सहा पाईपलाईन खोदली तेंव्हा सहा फुटाचा खड्डा आहे तो बुजलेला नाही. त्यामुळे नागरिकांचे हाल होत आहेत.
Madhyam Network / Madhyam News
#माध्यम या मराठी चॅनलवर आपलं स्वागत.महाराष्ट्रासह राष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी अगदी सोप्या शब्दांत खास आपल्या साठी