अंबाजोगाई/ केज तालुक्यातील वाघेबाभूळगाव मध्यम प्रकल्पाच्या कालव्यातून प्रवाहित होणारे पाणी आजूबाजूच्या शेतात घुसून शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान होण्याच्या घटना अतिवृष्टी काळात वारंवार घडत आहेत. त्यामुळे आ. नमिता मुंदडा यांनी सदरील कालव्याच्या दुरुस्तीची मागणी करून शासन दरबारी सातत्याने पाठपुरावा सुरु ठेवला होता. अखेर आ. मुंदडा यांच्या प्रयत्नांना यश आले असून कालव्याच्या दुरुस्तीसाठी २ कोटी २१ लाख ८० हजार ९१६ रुपयांचा निधीस शुक्रवारी (दि.२२) प्रशासकीय मान्यता मिळाली आहे.
शेतांचे संभाव्य नुकसान टळणार
निविदा निघाल्यानंतर लवकरच कालव्याच्या दुरुस्तीच्या कामास सुरुवात होणार आहे. दुरुस्तीचे काम पूर्ण झाल्यानंतर भविष्यात वाघेबाभूळगाव प्रकल्पाच्या कालव्यातून पाणी शेतात जाणार नाही, त्यामुळे शेतीच्या संभाव्य नुकसान आळा बसणार आहे.
-आ. नमिता मुंदडा
वाघेबाभूळगाव मध्यम प्रकल्पाची साठवण क्षमता ४.८५ द.ल.घ.मी. असून सिंचन क्षमता ६९० हेक्टर आहे. एरवी शेतकऱ्यांसाठी लाभदायी असणारा हा प्रकल्प अतिवृष्टी झाल्यास काही शेतकऱ्यांसाठी अधूनमधून नुकसानदायी ठरू लागला होता. अतिवृष्टी झाल्यास पुराचे पाणी तीव्र वेगाने सांडव्या मधुन पुच्छ कालव्याव्दारे जात असताना नजीकच्या शेतात जाऊन शेताचे मोठे नुकसान होऊ लागले होते. त्यामुळे पावसाळा कालावधीत कालव्यातील प्रवाह नियंत्रणात राहून धरणाच्या दिशेने व लगतच्या शेताकडे जावून होणारे संभाव्य नुकसान टाळण्यासाठी कालव्यास संरक्षक भिंत बांधावी अशी मागणी केज विधानसभा मतदार संघाच्या आ. नमिता मुंदडा यांनी शासनाकडे लावून धरली होती. सतत पत्रव्यवहार आणि मुंबईत जलसंपदा विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांशी गाठीभेटी घेऊन त्यांनी कालव्याच्या दुरुस्तीसाठी पाठपुरावा सुरु ठेवला. अखेर त्यांच्या पाठपुराव्याला यश आले असून कालव्याच्या दुरुस्तीसाठी २ कोटी २१ लाख ८० हजार ९१६ रुपयांचा निधीस प्रशासकीय मान्यचे आदेश राज्यपालांच्या नावाने शासनाचे उपसचिव वैजनाथ चिल्ले यांनी दिले आहेत. (WAGHEBABHULGAON (BRANCH OFFICE),TQ kaij, Dist.: BEED, MAHARASHTRA (MH), India (IN), Pin Code:- 431126.)
Madhyam Network / Madhyam News
#माध्यम या मराठी चॅनलवर आपलं स्वागत.महाराष्ट्रासह राष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी अगदी सोप्या शब्दांत खास आपल्या साठी