महाराष्ट्र

माजलगावच्या आनंदनगरीत मुलींच्या दोन गटात फ्री स्टाईल हाणामारी; व्हिडिओ झाले व्हायरल!!

कॉमकॉलेजमध्ये तरुणांची आणि तरुणींची फ्री स्टाइल हणामारी आपण बघितली असले. मुलींच्या दोन गटातील मारहाणीचे व्हिडिओ आणि घटना आता सर्रास घडताना दिसत आहेत. सोशल मीडियावर अशा घटनांचे व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होतात. आता अशीच मुलींच्या दोन गटातील मारहाणीची घटना बीज जिल्ह्याच्या माजलगावमध्ये घडली आहे. विशेष म्हणजे शेकडोंच्या गर्दीत ही हाणामारी सुरू होती.
बीड जिल्ह्यातील माजलगाव शहरामध्ये ( Girls Freestyle Fight ) दरवर्षी गणेशोत्सवात आनंद मेळावा भरवला जातो. याचा आनंद घेण्यासाठी माजलगाव शहरातील अनेक नागरिक या आनंदनगरीमध्ये अनेक गोष्टी अनुभवण्यासाठी जातात. मात्र याच ठिकाणी कॉलेज कुमारींमध्ये कोणत्यातरी कारणावरून वाद झाला आणि त्यानंतर थेट फ्री स्टाइल हाणामारी पाहायला मिळाली. या हाणामारीचे व्हिडिओ अनेकांनी आपल्या कॅमेरात कैद केले आणि ते सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहेत.
माजलगाव शहरातील आनंदनगरीमध्ये ( Beed Video Viral ) अनेक कुटुंब, नागरिक आनंद घेण्यासाठी येत असतात. रात्रीच्या वेळेला या ठिकाणी सहभागी होतात. या ठिकाणी अनेक तरुण-तरुणींचे ग्रुपही दिसून येतात. मात्र या ठिकाणी एका ग्रुपमध्ये तरुणींच्या दोन ग्रुपमध्ये काही कारणावरून वाद निर्माण झाला. या वादाचं रुपांतर हे थेट फ्री स्टाइल हाणामारीत झालं. या तरुणींचं भांडण सोडवण्याचा प्रयत्न अनेकांनी केला. मात्र कोणाचंच न ऐकता तरुणींनी एकमेकांना मारण्यास सुरुवात केली. काही वेळानंतर त्यांना समजून सांगितल्यानंतरही त्या ऐकत नसल्याचा पाहून स्थानिक तरुणांनी आणि नागरिकांनी या सगळ्या घटनेचा व्हिडिओ आपल्या मोबाइल मध्ये कैद करायला सुरुवात केली.
मुलींच्या दोन गटातील फ्री स्टाइल हाणामारीचा व्हिडिओ बघता बघता सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला. अनेक जण आपल्या इन्स्टाग्राम, फेसबुक पेजवर हे व्हिडिओ मोठ्या प्रमाणात शेअर होऊ लागले. हे भांडण का झालं? हे मात्र अद्याप कोणालाही कळलेलं नाही. मात्र शेकडोंच्या गर्दीत फ्रीस्टाइल मारामारी करणाऱ्या या मुलींवर टीका होत आहे. त्यांना हाणामारी करताना ना घरच्यांचं भान राहिलं ना स्वतःच्या संस्कृतीचं, ना स्वतःच्या इज्जतीचं भान राहिलं. मात्र या व्हिडिओवर अनेकांनी कमेंट्स केल्या आहेत. सध्या सोशल मीडियावर हा व्हिडिओ तुफान व्हायरल झाला आहे.

Sudarshan Rapatwar

महाराष्ट्रातील प्रगल्भ पत्रकार मराठवाड्यातील पत्रकारितेला एक नवा आयाम देण्याचा त्यांचा यशस्वी प्रयत्न असतो. गावातील पत्रकारिता जिल्ह्यात, राज्य आणि देश पातळीवर नेण्यात त्यांचे मोठे योगदान आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker