बीड

हातावर पोट असणाऱ्या छोट्या व्यावसायिकांना पावसाळी छत्र्यांचे वाटप

रोटरी क्लब आणि व्दारकादास मंत्री प्रतिष्ठान ने घेतला पुढाकार

शहरामधील विविध ठिकाणी हातावर पाेट भागवणाऱ्या गरजवंत व्यवसायीकांची पावसामुळे गैरसोयी  होऊ नये, त्यांचा रोजगार खंडित होऊ नये म्हणून राेटरी क्लब ऑफ बीड सेंट्रल आणि द्वारकादास मंत्री सामाजिक प्रतिष्ठाचा संयुक्तविद्यमाने साेमवारी (दि. ११) माेठ्या २५ छत्रीचे वाटप करण्यात आले. यावेळी व्यवसायीकांनी माेफत छत्री पावसाच्या दिवसात उपलब्ध करुन दिल्याबद्दल समाधान व आभार मानले.
बीड शहरामधील डाॅ. बाबासाहेब आंबेडकर चाैक पुतळा, माळीवेस, सुभाष राेड, भाजी मंडई, सांगली बँक काॅर्नर यासह इतर भागामध्ये जे छाेटे व्यवसायीक आहेत. त्यांना पावसाळ्यामध्ये माेठ्या गैरीसाेयीला सामाेरे जावे लागते. ही गरजवंतांची अडचण ओळखून राेटरी क्लब ऑफ बीड सेंट्रल आणि द्वारकादास मंत्री सामाजिक प्रतिष्ठाचा संयुक्तविद्यमाने २५ माेठ्या आकाराच्या छत्री वाटप करण्याचे नियाेजन केले. साेमवारी (दि. ११)  हा उपक्रम प्रत्यक्षात राबवला. द्वारकादास मंत्री सामाजिक प्रतिष्ठानचे सर्वेसर्वा डाॅ. नितीन मंत्री राेटरी क्लब ऑफ बीड सेंट्रल संस्थापक अध्यक्ष तथा या प्राेजेक्टचे चेअरमन संदेश लाेळगे, सुकेश राव यांच्या मार्गदर्शनाखाली व क्लबचे अध्यक्ष परमेश्वर जाधव, सचीव रवी उबाळे यांच्या नेतृत्वाखाली हा उपक्रम राबवण्यात आला. शहरात विविध ठिकाणी माेफत छत्री वाटपाच्या वेळी क्लबचे ज्ञानेश्वर तांबे, गणेश वाघ, कचरु चांभारे, अजय घाेडके, गिरीष गिलडा, मुकेश अग्रवाल, महेश जाेशी, अभिनंदन कांकरीया, सुहास बेदरे, समाधान कुलकर्णी, डाॅ. सुहास  धुमाळ, डाॅ. सचीन वारे, सुशील अब्बड, उमेश संचेती, प्रितेश संचेती, राजीव संचेती, अतुल जाजू, संदीप डाेंगरे, प्रमाेद करमाळकर, प्रदीप मालपाणी, हेमंत बडवे, डाॅ. शाम चरखा, नितीन सारडा, विश्वास शेंडगे यांच्यासह सर्व बाेर्ड ऑफ डायरेक्टर, क्लबचे सदस्य व पदाधिकारी माेठ्या संख्येने उपस्थित हाेते.

अजाेबा यांच्या स्मरणार्थ उपक्रम: द्वारकादास मंत्री हे माझे अजाेबा आहेत. त्यांचे सामाजिक कार्यात माेठे याेगदान हाेते. त्यांच्या स्मरणार्थ साेमवारी राेटरी क्लब ऑफ बीड सेंट्रल आणि द्वारकादास मंत्री सामाजिक प्रतिष्ठान च्या वतीने गरजवंत छाेटे व्यवसायीकांना छत्री वाटपाचा उपक्रम राबवला आहे. – डाॅ. नितीन मंत्री, सर्वेसर्वा प्रतिष्ठान, बीड.

गरजवंतांना मदतीच्या उपक्रमात सहभाग

बीड शहरामध्ये मागील आठ वर्षापासून राेटरी क्लब ऑफ बीड सेंट्रलद्वारे विविध उल्लेखनीय सामाजिक उपक्रम राबवले आहेत. द्वारकादास मंत्री सामाजिक प्रतिष्ठान यांच्या समवेत हा गरजवंतांना मदतीच्या उपक्रमात सहभाग घेतला. व्यवसायीकांनी व्यक्त केलेले समाधान हे प्रेरणादायी आहे .

Team Madyam

Madhyam Network / Madhyam News #माध्यम या मराठी चॅनलवर आपलं स्वागत.महाराष्ट्रासह राष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी अगदी सोप्या शब्दांत खास आपल्या साठी

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker