काय तो दांडा, काय ते ढुं… म्हणणाऱ्या शीतल म्हात्रेंचा शिंदे गटात प्रवेश
मुंबई / राज्याच्या राजकारणात गेल्या महिन्याभरात अनेक घडामोडी पाहायला मिळाल्या. एकनाथ शिंदे सोबत शिवसेनेच्या ४० आमदारांच्या बंडखोरीमुळे महाविकास आघाडी सरकारला पायउतार व्हावं लागलं. दरम्यान, गेल्या काही दिवसापूर्वी शिंदे गटातील बंडखोर आमदारांवर टीकेची झोड उठविणाऱ्या शिवसेनेच्या माजी नगरसेविका शीतल म्हात्रे यांनी मात्र आता शिंदे गटात प्रवेश केल्याने खळबळ उडाली आहे.
मुंबई महापालिका निवडणुकांच्या तोंडावर शीतल म्हात्रे यांनी शिंदे गटात उडी घेतली आहे. दरम्यान, शिंदेंच्या या बंडात ठाणे, नवी मुंबई, कल्याण डोंबिवली आणि उल्हासनगरमधील नगरसेवक सामील झाले होते. मुंबईतून एकही नगरसेवक शिंदे गटात गेला नव्हता. शीतल म्हात्रे यांनी बंड केल्याने त्या शिंदे गटात जाणाऱ्या मुंबईतील पहिल्याच नगरसेविका ठरल्या आहेत.
आठ दिवसांपूर्वीच शीतल म्हात्रे यांनी शिंदे गटाविरोधात आगपाखड केली होती. शिंदे गटाला धडा शिकवण्याचं
जाहीर वक्तव्यही त्यांनी केलं होतं. त्यानंतर त्याच स्वत: शिंदे गटात सामील झाल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.