“फाईल नंबर – ४९८ अ” मध्ये झळकणार हार्दिक जोशी आणि अक्षया देवधर
हार्दिक जोशी, अक्षया देवधर चित्रपटात पहिल्यांदाच एकत्र

‘फाईल नंबर – ४९८ अ’ चित्रपटाच्या चित्रीकरणाला मुंबई येथे सुरुवात “तुझ्यात जीव रंगला” या मालिकेतून महाराष्ट्राच्या घराघरांत पोहोचलेले राणादा आणि पाठक बाई अर्थात हार्दिक जोशी आणि अक्षया देवधर ही जोडी आता पहिल्यांदाच चित्रपटात एकत्र दिसणार आहे. ‘फाईल नंबर – ४९८ अ” या चित्रपटात हे दोघं महत्त्वाच्या भूमिकांत दिसणार आहेत.
आरती श्रीधर तावरे यांची निर्मिती असलेल्या आणि मनीष हर्षा मुव्हीज प्रस्तुत मल्हार गणेश दिग्दर्शित “फाईल नंबर ४९८ अ” या चित्रपटाची कथा श्रीधर तावरे यांनी लिहिली आहे. तर श्रीधर तावरे आणि आशिष निनगुरकर यांनी पटकथा लिहिली आहे. संवाद आणि गीतलेखन आशिष निनगुरकर यांचं आहे. स्वप्नील- प्रफुल्ल यांनी संगीत दिग्दर्शनाची जबाबदारी निभावली आहे. कायद्यातील ४९८ अ या कलमाअंतर्गत एक तरुण कसा अडकतो याची गोष्ट या चित्रपटात मांडण्यात आली आहे. अलीकडेच या चित्रपटाचं पोस्टर लाँच करण्यात आलं होतं.
हार्दिक जोशी आणि अक्षया देवधर या जोडीवर महाराष्ट्रानं भरभरून प्रेम केलं आहे. या मालिकेनंतर आता त्यांचा नवा प्रवास सुरू झाला आहे. त्यामुळे ही जोडी पुन्हा कधी एकत्र दिसणार याकडे त्यांच्या चाहत्यांचं लक्ष लागलं होतं. हार्दिक, अक्षयानं पुन्हा एकत्र काम करण्याची चाहत्यांची इच्छा “फाईल नंबर ४९८ अ” या चित्रपटामुळे पूर्ण होणार आहे. या चित्रपटात हार्दिक आणि अक्षया प्रमुख भूमिकांमध्ये दिसतील. नावापासूनच उत्सुकता निर्माण केलेल्या या चित्रपटातून हार्दिक आणि अक्षया पहिल्यांदाच चित्रपटात एकत्र येणार असल्याने या चित्रपटाविषयीचं कुतूहल अधिकच वाढलं आहे हे नक्की.
File No 498A : ‘फाईल नंबर 498 A’ हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
‘फाईल नंबर 498 A’ (File No 498A) हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकतेच या सिनेमाचे पोस्टर लॉंच करण्यात आले आहे. मराठी चित्रपटांमध्ये आत्तापर्यंत न्यायव्यवस्थेशी संबंधित किंवा कोर्टरूम ड्रामा प्रकारातील काही चित्रपट येऊन गेले. त्यात आता मल्हार गणेश दिग्दर्शित ‘फाईल नंबर- 498 A’ या आगळ्यावेगळ्या नावाच्या चित्रपटाची भर पडत असून, या चित्रपटाचं टीजर पोस्टर नुकतंच सोशल मीडियाद्वारे लाँच करण्यात आलं आहे.
सौ.आरती श्रीधर तावरे यांची निर्मिती असलेल्या आणि मनीष हर्षा मुव्हीज प्रस्तुत ‘फाईल नंबर – 498 A” या चित्रपटाची कथा श्रीधर शंकर तावरे यांनी लिहिली आहे. तर श्रीधर शंकर तावरे आणि आशिष निनगुरकर यांनी पटकथा लिहिली आहे. संवाद आणि गीतलेखन आशिष निनगुरकर यांचं आहे. स्वप्नील प्रफुल्ल यांनी संगीत दिग्दर्शनाची जबाबदारी निभावली असून कायद्यातील 498 A या कलमाअंतर्गत एक तरुण कसा अडकतो याची गोष्ट या चित्रपटात मांडण्यात आली आहे.
आतापर्यंत काही चित्रपटांमध्ये कोर्टरूम ड्रामा सादर झाला असला, तरी “फाईल नंबर- 498 A” हा चित्रपट अधिक वेगळ्या पद्धतीनं सादर होणार आहे. पोस्टरवर मागणारे हात आणि मंगळसूत्रात बांधलेले हात, पार्श्वभूमीवर उडणारी कबुतरं दिसत असल्यानं स्वातंत्र्य, बंधनं या बाबतची मांडणी चित्रपटात असेल असा अंदाज आपल्याला करता येतो. चित्रपटाचं पोस्टर लक्षवेधी असून,चित्रपटातील कलाकारांची नावे अद्याप गुलदस्त्यात ठेवण्यात आली आहे. या सिनेमाचे पोस्टर प्रदर्शित झाल्याने प्रेक्षक सिनेमाची आतुरतेनं वाट पाहत आहेत. या सिनेमाचे नावच आगळेवेगळे असल्याने प्रेक्षकांना सिनेमाची उत्सुकता आहे. या सिनेमात अनेक विषयांवर भाष्य करण्यात येणार आहे.




