दोन वेळा शिक्षा भोगून आल्यावर सुद्धा करत होता गर्भपात
१० वी पर्यंत शिक्षण, फसवून कंपाऊंडर बनून शिकला गर्भपात करायला,


परळी पोलिसांनी अवैध गर्भपात केल्याप्रकरणी ( Parli Abortion Case ) बार्शीतील (सोलापूर) तोतया डॉक्टर नंदकुमार स्वामी ( nandkumar swami ) याला अटक केली आहे. याची संपूर्ण माहिती केली असता सोलापुरातील बार्शी व करमाळा या तालुक्यातील न्यायालयाने नंदकुमार स्वामीला दोन वेळा अवैध गर्भपात केल्या प्रकरणी शिक्षा सुनावली आहे.
सोलापूर – परळी पोलिसांनी अवैध गर्भपात ( Parli Abortion Case ) केल्याप्रकरणी बार्शीतील (सोलापूर) तोतया डॉक्टर नंदकुमार स्वामी ( nandkumar swami ) याला अटक केली आहे. याची संपूर्ण माहिती केली असता सोलापुरातील बार्शी व करमाळा या तालुक्यातील न्यायालयाने नंदकुमार स्वामीला दोन वेळा अवैध गर्भपात केल्या प्रकरणी शिक्षा सुनावली आहे. पण, त्यामधून तो वरिष्ठ न्यायालयात अपील करून जामीनावर बाहेर आला होता. नंदकुमार स्वामी याविरोधात अनेकवेळा तक्रारी करून देखील सोलापूर येथील आरोग्य सेवेने त्यावर वेळीच प्रतिबंधात्मक कारवाई न केल्याने परळी येथील विवाहितेवर अशी दुर्दैवी वेळ आली आहे.
कारण गेल्या वर्षी नंदकुमार स्वामीवर कारवाई करावी अशी तक्रार राज्याचा आरोग्य सेवेला करण्यात आली होती. आरोग्य सेवा कुटुंब कल्याण पुणे यांनी सोलापूर जिल्हा शल्य चिकित्सक यांना 25 ऑक्टोबर 2021 रोजी मेल करून कारवाई करण्याचा सूचना केल्या होत्या. मात्र, ही बाब सोलापूर येथील जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रदीप ढेले यांनी गांभीर्याने न घेतल्याने तोतया डॉक्टर नंदकुमार स्वामीने परळी येथे पीस-मिल या थेरेपीद्वारे गर्भ कापून बाहेर काढले. गर्भ तोडून बाहेर काढणे ही अतिशय अघोरी प्रक्रिया असल्याची माहिती एका स्त्री रोग तज्ञाने बोलताना दिली आहे
नंदकुमार रामलिंग स्वामी हा बार्शीत दत्तनगर येथे गेल्या अनेक वर्षांपासून राहत आहे. एका खाजगी डॉक्टरकडे त्याने अनेक वर्षे कंपाऊंडर म्हणून काम केलं. त्याने जेमतेम 10 वी पर्यंत शिक्षण घेतले होते. दवाखान्यात कंपाऊंडर म्हणून काम करताना त्याने अर्धवट मेडिकल नौलेज घेतले होते. अवैधरित्या गर्भपात केल्याने झटपट आणि अफाट पैसा मिळतो यासाठी त्याने हा गोरख धंदा सुरू केला होता. बार्शी येथून त्याने आपले रॅकेट सुरू केले आणि याचे जाळे बार्शी, करमाळा, उस्मानाबाद, बीड, परळीपर्यंत पसरवले. बार्शी आणि करमाळा येथे त्यावर अवैधरित्या गर्भपात करताना सापळा कारवाई झाली होती. त्यामध्ये त्याला शिक्षा देखील झाली होती.
चायना मेड मशिनरीने करायचा गर्भपात – अवैध गर्भपात करण्यासाठी स्वामीने चायना मेड मशनरी खरेदी केली होती. वैद्यकीय उपकरणाच्या बाजारातून एमटीपी किट खरेदी केल्या होत्या. त्यामध्ये सोनोग्राफी मशीन सदृश्य टीव्ही, कैंची, रॉड आदी साहित्य विकत घेऊन एका चारचाकी वाहनांतून अवैध गर्भपात करण्याचा धंदा 2014 पासून सुरू केला. 2014 पासून बार्शी, करमाळा, उस्मानाबाद, बीड आदी शहरात त्याने आपले नेटवर्क तयार केले आणि पैसा कमविण्यास सुरुवात केली. पण, 2016 साली बार्शी येथे त्यावर अवैध गर्भपात केल्याप्रकरणी पीसीपीएडीटी अॅक्टनुसार गुन्हा दाखल झाला. या खटल्यात कोर्टाने त्याला 50 हजार दंड आणि तीन वर्षे सक्तमजुरीची शिक्षा ठोठावली होती. नंदकुमार स्वामी या तोतया डॉक्टरने वरिष्ठ कोर्टात अपील करून बार्शी येथील खटल्यातून जामिनावर सुटका करून घेतली होती.