अंबाजोगाई साहित्य संमेलनानिमित्त निबंध स्पर्धा


मसाप शाखा अंबाजोगाई आयोजित १० व्या अंबाजोगाई साहित्य संमेलनानिमित्त अनिवासी अंबाजोगाईकर यांच्यासाठी ‘माझे अंबाजोगाईतील बालपण’ याविषयावर निबंध स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे यात सर्व वयोगटातील स्पर्धकांना सहभाग घेता येईल.
सातशे ते दोन हजार शब्द मर्यादा असून ३१ जुलै २२ पर्यंत आपला निबंध पाठवता येईल. यात रोख बक्षिसे दिली जाणार असून प्रथम क्रमांक ३ हजार, द्वितीय २ हजार व तृतीय बक्षीस १ हजार रूपये असणार आहे. सहभागी स्पर्धकांना संमेलनात प्रमाणपत्र दिली जातील. तरी अनिवासी अंबाजोगाईकर यांनी या स्पर्धेत मोठ्या प्रमाणात सहभाग घ्यावा, असे आवाहन मसाप अध्यक्ष दगडू लोमटे यांनी केले आहे. या स्पर्धेचे संयोजक गोरख शेंद्रे, ज्योती शिंदे व भागवत मसने हे असणार आहेत, अशी माहिती लोमटे यांनी दिली आहे. स्पर्धेसाठीचे निबंध वॉटसप वरती लिहून पाठवायचे आहेत. हस्तलिखित पाठवु नयेत. निबंध 9923170212 या क्रमांकावर पाठवावेत असे आवाहन मसाप सचिव गोरख शेंद्रे यांनी केले आहे.
निबंध स्पर्धा ठळक माहिती
- विषय- माझे आंबाजोगाईतील बालपण
- सहभाग कोणाचा- अनिवासी आंबाजोगाईकर
- शब्दमर्यादा- 700 ते 2000
- वयोमर्यादा- नाही
- भाषा- कोणतीही
- अंतिम तारीख- 31 जुलै 22
- माध्यम- व्हाट्स अँप किंवा इमेल
- व्हाट्स अँप पाठवण्यासाठी क्र.- 9923170212
- ई-मेल- ambajogaisahitya@gmail.com
सूचना-
- मजकूर टाइप केलेला असावा.
- मजकुरा सोबत विद्यमान पत्ता, मोबाईल क्रमांक लिहावा.
- बक्षीस- ₹3000/, ₹200/, ₹1000
- बक्षीस वितरण- 10व्या संमेलनात
- प्रमाणपत्र- सर्व सहभागी स्पर्धक
- पुस्तक- निवडक लेखांचे पुस्तक पुढील संमेलनात प्रकाशित होईल
संयोजक- गोरख शेंद्रे, ज्योती शिंदे, भागवत मसने
विनीत- दगडू लोमटे, अध्यक्ष, मसाप, आंबाजोगाई