मराठी पत्रकार परिषदेच्या अध्यक्षपदी शरद पाबळे यांची निवड
![](https://madhyamnews.com/wp-content/uploads/2022/08/IMG_20220830_132057.jpg)
![](https://madhyamnews.com/wp-content/uploads/2022/08/IMG_20220830_132057.jpg)
२ सप्टेंबरला पुण्यात होणार सत्कार
पुण्यातील ज्येष्ठ पत्रकार शरद पाबळे हे मराठी पत्रकार परिषदेचे नवे अध्यक्ष असतील.. १ सप्टेंबर २०२२ रोजी ते आपल्या पदाची सूत्रे हाती घेत आहेत .. शरद पाबळे यांची अध्यक्षपदी नियुक्ती होत असल्याने शुक्रवार दिनांक २ सप्टेंबर रोजी पुणे जिल्हा मराठी पत्रकार संघाच्यावतीने त्यांचा सत्कार करण्यात येत आहे..
मराठी पत्रकार परिषदेच्या घटनेनुसार कार्याध्यक्ष हाच पुढील अध्यक्ष असतो.. त्यानुसार कार्याध्यक्ष राहिलेले शरद पाबळे आता अध्यक्ष होत आहेत..मावळते अध्यक्ष गजानन नाईक यांच्याकडून ते सूत्रे स्वीकारतील.. त्यांची अध्यक्षपदाची मुदत दोन वर्षांची असेल…
शरद पाबळे यांची अध्यक्षपदी नियुक्ती होत असल्याबद्दल परिषदेचे मुख्य विश्वस्त एस एम देशमुख आणि विश्वस्त किरण नाईक यांनी त्यांचे अभिनंदन केले असून त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत..
८३ वर्षांची परंपरा असलेल्या मराठी पत्रकार परिषदेचे शरद पाबळे हे ४४ वे राष्ट्रीय अध्यक्ष असतील.. शरद पाबळे हे सकाळचे प्रतिनिधी म्हणून काम पाहतात.. गेली २५ वर्षे पत्रकारितेत असलेल्या शरद पाबळे यांनी पुणे जिल्हा मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष म्हणून देखील काम पाहिलेले आहे..
शरद पाबळे यांची अध्यक्षपदी निवड होत असल्याबद्दल पुणे जिल्हा मराठी पत्रकार संघाच्यावतीने त्यांचा शुक्रवार दिनांक २ सप्टेंबर रोजी डॉ. चिमा सभागृह
हॉर्टीकल्चर कॉलेज इमारत
अँग्रीकल्चर कॉलेज, पुणे.
येथे सकाळी साडेदहा वाजता एस.एम देशमुख यांच्या हस्ते सत्कार करण्यात येत आहे.. यावेळी परिषदेचे विश्वस्त किरण नाईक तसेच अन्य पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत..
बर्याच वर्षानंतर मराठी पत्रकार परिषदेचे अक्षपद पुणे जिल्ह्याला मिळत आहे.. पुणे जिल्ह्यातील पत्रकारांसाठी ही आनंदाची बाब आहे.. त्यामुळे पुणे जिल्ह्यातील जिल्हा संघाचे सर्व सदस्य तसेच पत्रकारांनी मोठ्या संख्येनं या सत्कार सोहळ्यास उपस्थित राहावे असे आवाहन पुणे जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष सुनील लोणकर यांनी केले आहे..