ठळक बातम्याबीडमहाराष्ट्र

जिल्हा परिषद पंचायत समित्यांच्याआरक्षण सोडतीला स्थगिती;

राज्य निवडणूक आयोगाचे आदेश

बीड जिल्हा परिषद, पंचायत समित्यांसाठी दि. १३ रोजी होणारी आरक्षण सोडत पुढे ढकलली आहे. ओबीसी आरक्षणाच्या प्रश्नावर सर्वोच्च न्यायालयात सुरु असलेल्या सुनावणीच्या पार्श्वभूमीवर राज्य निवडणूक आयोगाने हा निर्णय घेतला. राज्यातील जिल्हा परिषद, पंचायत समित्यांच्या निवडणुकीसाठीची आरक्षण सोडत रद्द करण्याचे आदेश राज्य निवडणूक आयोगाने आज दिले. सर्वोच्च न्यायालयात ओबीसी आरक्षणाची याचिका सुरु असून त्यात १९ जुलैला पुढील सुनावणी असल्याचा दाखला देत आयोगाने आरक्षण सोडत पुढे ढकलली आहे.

राज्यातील 25 जिल्हा परिषदा व त्यांतर्गतच्या 284 पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी देण्यात आलेला आरक्षण सोडत कार्यक्रम सर्वोच्च न्यायालयात आज झालेल्या सुनावणीच्या पार्श्वभूमीवर स्थगित करण्याचा निर्णय राज्य निवडणूक आयोगाने घेतला आहे. राज्य निवडणूक आयोगाने 5 जुलै 2022 रोजीच्या पत्रान्वये संबंधित जिल्हा परिषदा व त्यांतर्गतच्या पंचायत समित्यांच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकांसाठी आरक्षण सोडतीचा कार्यक्रम दिला होता; स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसंदर्भात सर्वोच्च न्यायालयात दाखल याचिकेसंदर्भात आज सुनावणी झाली.  एका आठवड्यानंतर पुढील सुनावणी होणार आहे. या पार्श्वभूमीवर आरक्षण सोडतीचा कार्यक्रम स्थगित केला आहे. सुधारित आरक्षण सोडत कार्यक्रम यथावकाश देण्यात येईल, असे राज्य निवडणूक आयोगाच्या प्रसिद्धिपत्रकात नमूद केले आहे.

जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणूका 2022 आरक्षण सोडतीचा कार्यक्रम

मा. राज्य निवडणूक आयोग,महाराष्ट्र यांचे सदर्भीय पत्रान्वये  जिल्हा परिषद व त्या अंतर्गत पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणूका-2022  आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर झालेला आहे. मा. राज्य निवडणूक आयोग, महाराष्ट्र यानी दिलेल्या प्रपत्र -3 मधील सूचनेनुसार दि. 13 जुलै 2022 (वार-बुधवार) रोजी ठिक दुपारी 1:00 वाजता जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूकांकरिता आरक्षण सोडत जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन सभागृहामध्ये आयोजित करण्यात आलेली आहे.

तरी सदर बैठकीस राजकीय पक्षांचे जिल्हाध्यक्ष तसेच प्रतिष्ठीत नागरीक यांना निमंत्रित करण्यात आलेले आहे. सदर बैठकीस उपस्थित राहतांना आपले आधार कार्ड ई. ओळखपत्र सोबत ठेवावे असे डॉ. दयानंद जगताप उपजिल्हाधिकारी सामान्य जिल्हाधिकारी कार्यालय,बीड यांनी प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकाव्दारे कळविले आहे.

Team Madyam

Madhyam Network / Madhyam News #माध्यम या मराठी चॅनलवर आपलं स्वागत.महाराष्ट्रासह राष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी अगदी सोप्या शब्दांत खास आपल्या साठी

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker