डॉ.शरद पवार, डॉ.नितीन गडकरी यांना डॉ. बामु विद्दापीठ देणार डिलीट
Dr.Sharad Pawar, Dr.Nitin Gadkari will be honour by Delete Bamu Vidyapeeth
व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ. नरेंद्र काळे यांच्या मागणी व प्रस्तावास राजभवनाची मान्यता मिळाली.


डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या वतीने ज्येष्ठ नेते खा. शरद पवार साहेब व केंद्रीय मंत्री ना. नितीन गडकरी यांना ‘डि. लीट’ ही पदवी देऊन दिक्षांत समारंभात गौरविण्यात येणार आहे.
खा. शरद पवार साहेबांना डि. लीट देण्यासंदर्भात सविस्तर प्रस्ताव व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ. नरेंद्र काळे यांनी मांडला होता. तो प्रस्ताव विद्यापीठाने मा. राज्यपाल महोदयांकडे मान्यतेसाठी पाठवला. होता. राजभवनाची या प्रस्तावाला मान्यता मिळाली आहे. तरी येत्या आक्टोबर महिन्यात होणाऱ्या दिक्षांत समारंभात श्री. शरद पवार साहेबांना व ना. नितीन गडकरी साहेबांना डिलीट देऊन गौरविण्यात येणार आहे.


डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या नामांतराचा निर्णय खा. शरद पवार साहेबांनी मुख्यमंत्री असताना घेतला होता . त्याच बरोबर कृषी, महिला सक्षमीकरण, सहकार, समाजकारण, राजकारण इ. क्षेत्रातील त्यांचे कार्य अद्वितीय आहे.
या बद्द्ल व्यवस्थापन सदस्य डॉ. नरेंद्र काळे यांनी मा. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी, मा. कुलगुरू डॉ. प्रमोद येवले सर, सर्व व्यवस्थापन परिषद सदस्य व अभिसभा सदस्यांचे आभार व्यक्त केले आहेत.