डॉ. नरेंद्र काळे यांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेशउपाध्यक्षपदी नियुक्ती
![](https://madhyamnews.com/wp-content/uploads/2022/08/narendra-kale.png)
![](https://madhyamnews.com/wp-content/uploads/2022/08/narendra-kale.png)
![](http://madhyamnews.com/wp-content/uploads/2022/08/IMG_20220823_185916-250x300.jpg)
![](http://madhyamnews.com/wp-content/uploads/2022/08/IMG_20220823_185916-250x300.jpg)
राष्ट्रवादी डॉक्टर सेल प्रदेशाध्यक्ष डॉ. नरेंद्र काळे यांची राष्ट्रवादी काँग्रेस च्या प्रदेश उपाध्यक्ष पदी तसेच लातूर शहर व ग्रामीण जिल्हा निरीक्षक पदी निवड करण्यात आली. अंबाजोगाई येथील डॉ. नरेंद्र काळे यांची महाराष्ट्र राष्ट्रवादी काँग्रेस च्या प्रदेश उपाध्यक्ष पदी तसेच लातूर शहर व ग्रामीण जिल्हा निरीक्षक पदी निवड करण्यात आली असून सदर निवडीचे पत्र प्रदेशअध्यक्ष आ. जयंत पाटील यांनी डॉ नरेंद्र काळे यांना दिले.
डॉ. नरेंद्र काळे यांना पक्ष संघटना बांधण्याचा दांडगा अनुभव असून अगामी काळात होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने डॉ. नरेंद्र काळे यांच्या अनुभवाचा फायदा अगामी काळात होईल. दरम्यान, डॉ नरेंद्र काळे यांची निवड जाहीर होताच सर्व स्तरातून डॉ. काळे यांच्या निवडीचे स्वागत होत आहे.
डॉ. नरेंद्र काळे यांनी मानले आभार!
महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस च्या प्रदेश उपाध्यक्ष पदी माझी निवड करण्यात आली. प्रदेश अध्यक्ष मा. जयंतराव पाटील साहेबांच्या हस्ते नियुक्ती पत्र देऊन मला प्रदेश उपाध्यक्ष पदा सह लातुर शहर व ग्रामीण जिल्ह्याच्या निरीक्षक पदाची जबाबदारी देण्यात आली. गेली सलग नऊ वर्षे डॉक्टर सेल चे प्रदेशाध्यक्ष पदावर काम करताना राज्यातील सर्व राष्ट्रवादी काँग्रेसच्या डॉक्टरांनी मला केलेल्या सहकार्याबद्दल मी त्यांचे आभार व्यक्त करतो. पुढील काळात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष बळकट करण्यासाठी या पदावर सक्षमपणे कार्य करेन. नव्या जबाबदारी बद्दल राष्ट्रीय अध्यक्ष खा. शरदचंद्रजी पवार साहेब, विरोधी पक्षनेते आ. अजितदादा पवार, प्रदेशाध्यक्ष मा. जयंतराव पाटील साहेब, खा. सुप्रिया ताई सुळे, माजी मंत्री आ. धनंजय मुंडे साहेब, प्रदेश सरचिटणीस शिवाजीराव गर्जे, कोषाध्यक्ष मा
हेमंत टकले यासह पक्षाचे सर्व नेते व कार्यकर्ते यांचे आभार व्यक्त करतो.