करोना काळात कोट्यवधी लोकांनी घेतली डोलो गोळीच्या प्रिस्किप्शनसाठी डॉक्टरांना दिली १ हजार कोटींची फ्री गीफ्ट
आयकर विभागाच्या तपासणीत धक्कादायक माहिती उघडकीस आली


Dolo 650 Maker Gave Freebies to Doctors Worth 1000 Crore : साधारणपणे तापावरील उपचारार्थ वापरली जाणारी डोलो-६५० औषध प्रत्येक घरात आढळतं. करोना काळात अनेकांनी डोलो -६५० गोळी घेतली. त्यामुळे डोलोची निर्मिती करणाऱ्या मायक्रो लॅब्स कंपनीचा नफा प्रचंड वाढला. त्यामुळे कंपनी आयकर विभागाच्या रडारवर आली.
मुंबई / साधारणपणे तापावरील उपचारार्थ वापरली जाणारी डोलो – ६५० औषध प्रत्येक घरात आढळतं. करोना काळात अनेकांनी डोलो-६५० गोळी घेतली. त्यामुळे डोलोची निर्मिती करणाऱ्या मायक्रो लॅब्स कंपनीचा नफा प्रचंड वाढला. त्यामुळे कंपनी आयकर विभागाच्या रडारवर आली. त्यानंतर आता डोलो – ६५० बद्दल आश्चर्यकारक माहिती समोर आली आहे.
डोलो-६५० चा वापर वाढावा यासाठी कंपनीनं डॉक्टरांना १००० कोटी रुपयांचे फ्री गिफ्ट दिले असल्याची धक्कादायक माहिती उघडकीस आली. बिझनेस टुडेनं दिलेल्या वृत्तानुसार, ६ जुलैला आयकर विभागाच्या पथकानं मायक्रो लॅब्स लिमिटेडच्या ९ राज्यांमधील ३६ ठिकाणांवर छापे टाकले. कंपनीविरोधात झालेल्या कारवाईतून १.२९ कोटी रुपयांची बेहिशोबी रोख रक्कम आणि १.४० कोटी रुपयांचे दागिने हाती लागल्याची माहिती सीबीडीटीनं दिली.
या प्रकरणी कंपनीची प्रतिक्रिया घेण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र कंपनीनं ई-मेलला उत्तर दिलं नाही. सीबीडीटीनं दिलेल्या माहितीनुसार, १००० हजार कोटी रुपयांचे मोफत गिफ्ट कंपनीकडून डॉक्टरांना देण्यात आले. कागदपत्रं आणि डिजिटल डेटामधून ही माहिती उघडकीस आली आहे. ही कागदपत्रं आणि डिजिटल डेटा छाप्यांच्या दरम्यान आयकर विभागाच्या हाती लागला. आपल्या उत्पादनाचा वापर वाढावा यासाठी कंपनीनं ाटल्याचं स्पष्ट झालं आहे.