धुंडिराज शास्त्री पाटंगणकर महाराजांच्या निधनाने अध्यात्मिक क्षेत्राची मोठी हानी
पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांनी व्यक्त केल्या शोकभावना


बीड / अध्यात्मिक क्षेत्रातील थोर व्यक्तिमत्व धुंडिराज शास्त्री महाराज पाटांगणकर यांच्या निधनाने जिल्हयाच्या अध्यात्मिक क्षेत्राची मोठी हानी झाली आहे अशा शब्दांत भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांनी शोकभावना व्यक्त करत त्यांना भावपूर्ण श्रध्दांजली अर्पण केली.
धुंडिराज शास्त्री महाराजांच्या निधनाची बातमी सायंकाळी कानावर आली आणि धक्काच बसला. महाराजांचे अध्यात्मिक क्षेत्रातील योगदान मोठे होते. पन्नास वर्षाहून अधिक काळ ते या क्षेत्रात कार्यरत होते. लोकनेते गोपीनाथराव मुंडे व परिवाराशी त्यांचा विशेष स्नेह होता. अनेक वेळा त्यांचेशी संवाद साधण्याचा योग आला, विविध विषयांवर ते मनमोकळे बोलायचे. आयुर्वेदाचे ते गाढे अभ्यासक होते. त्यांच्या निधनाने अध्यात्मिक तसेच आयुर्वेद क्षेत्राचे मोठे नुकसान झाले आहे, त्यांना माझी भावपूर्ण श्रध्दांजली अशा शब्दांत पंकजाताईंनी आपल्या शोकभावना व्यक्त केल्या.
बीड येथील संत जनीजनार्धन संस्थानचे मठाधिपती ह.भ.प.धुंडीराजशास्त्री पाटांगणकर महाराज यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेऊन त्यांना आदरांजली अर्पण केली. महाराजांनी अध्यात्माच्या मार्गाने शिकवलेली मानवतेची शिकवण सतत आम्हाला सन्मार्ग दाखवत राहील. pic.twitter.com/gVgS2z36v4
— Dhananjay Munde (@dhananjay_munde) July 16, 2022