पक्ष चिन्ह वाचवण्यासाठी शिवसेनेची निवडणूक आयोगाकडे धाव
शिवसेना प्रादेशिकतेच्या पोटातून जन्माला आलेला राजकीय पक्ष
![](https://madhyamnews.com/wp-content/uploads/2022/07/shivsena.png)
![](https://madhyamnews.com/wp-content/uploads/2022/07/shivsena.png)
मुंबई आमदारांच्या बंडानंतर शिवसेनेचे दोन भाग झाले आहेत. आता ठाकरे गटाला पक्षाचे चिन्ह धनुष्य बाण आपल्या हातातून निसटू नये याची काळजी लागली आहे. शिवसेनेचे चिन्ह धनुष्यबाण आहे, त्या चिन्हाबाबत कोणताही निर्णय निवडणूक आयोगाने घेऊ नये, कोणताही निर्णय घेण्याआधी आमची बाजू ऐकून घ्यावी,” अशी विनंती शिवसेनेकडून निवडणूक आयोगाला करण्यात आली आहे.
सध्या ठाकरे गट आणि शिंदे गट यांच्यामध्ये खरी शिवसेना कुणाची याचा वाद रंगला आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेनेकडून कायदेशीर लढाईसाठीही जोर लावला जात आहे. मुंबई, दिल्लीतील कायदेतज्ज्ञ, वकीलांसोबत शिवसेना नेत्यांच्या बैठका सुरू आहेत. दरम्यान शिंदे गटाने काही दिवसापूर्वी पक्षाचे चिन्ह धनुष्यबाणावर आपला दावा सांगितला होता. तर उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांना नवीन चिन्हासाठी तयार राहण्याचे आवाहन केले होते.
शिवसेना : प्रादेशिकतेच्या पोटातून जन्माला आलेला राजकीय पक्ष
शिवसेनेची स्थापना 19 जून 1966 रोजी बाळासाहेब ठाकरे यांनी महाराष्ट्रातील स्थानिक लोकांच्या हक्कांसाठी लढण्यासाठी केली होती. ठाकरे हे मूळचे व्यंगचित्रकार होते आणि राजकीय विषयांवर ते धारदार टोमणे मारायचे. शिवसेना अनेक राज्यांत सक्रिय असली तरी तिचा राजकीय प्रभाव महाराष्ट्रापुरता मर्यादित आहे.
सध्या त्याचे प्रमुख बाळासाहेबांचे पुत्र उद्धव ठाकरे आहेत. शिवसेनेचे निवडणूक चिन्ह धनुष्यबाण, तर वाघ हे चिन्ह आहे. शिवसेना हा हिंदू राजकीय पक्ष म्हणून ओळखला जातो. 2018 च्या अखेरीस उद्धव यांनी अयोध्येत रामललाला भेट देऊन रामजन्मभूमीच्या मुद्द्याला हवा दिली होती.
शिवसेना स्थापनेच्या वेळी बाळासाहेब ठाकरे यांनी ‘अंशी घ्या समाजकारण, विस घ्या राजकरण’ असा नारा दिला होता. म्हणजे 80 टक्के समाज आणि 20 टक्के राजकारण. ‘भूमिपुत्र’ (स्थानिक रहिवासी) या मुद्द्याला बराच काळ पाठिंबा मिळत नसल्याने शिवसेनेने हिंदुत्वाचा मुद्दा स्वीकारला, जो आजवर कायम आहे.
शिवसेनेने 1971 मध्ये पहिली निवडणूक लढवली होती पण त्यात यश मिळाले नाही. 1989 च्या लोकसभा निवडणुकीत पहिल्यांदाच शिवसेनेचा खासदार निवडून आला. शिवसेनेने पहिल्यांदा 1990 मध्ये महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक लढवली, ज्यामध्ये त्यांचे 52 आमदार निवडून आले.
पक्षाचे 16व्या लोकसभेत 18 आणि राज्यसभेत तीन खासदार आहेत. शिवसेनेचे दोन नेते मनोहर जोशी आणि नारायण राणे हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राहिले आहेत. मात्र, नारायण राणेंनी आता शिवसेनेशी फारकत घेतली आहे. मुंबई महानगरपालिका (BMC) देखील शिवसेनेच्या ताब्यात आहे.