रविवारपासून धनंजय मुंडे यांच्या ‘राष्ट्रवादी आपल्या दारी’ अभियानास पुन्हा सुरुवात
परळी शहरातील घरोघरी भेटी देऊन नागरीकांशी संवाद साधणार
![](https://madhyamnews.com/wp-content/uploads/2022/07/dhananjay-munde.png)
![](https://madhyamnews.com/wp-content/uploads/2022/07/dhananjay-munde.png)
बीड / राज्याचे माजी सामाजिक न्याय मंत्री तथा परळीचे आ. धनंजय मुंडे यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाने सुरू केलेले ‘राष्ट्रवादी आपल्या दारी… विकासाची प्रभागफेरी’ हे अभियान रविवार पासून (दि. 17 ) पुन्हा सुरू करण्यात येत असून, धनंजय मुंडे हे आपल्या सहकारी – पदाधिकाऱ्यांच्या सोबतीने रविवारी सकाळी 8 वाजल्यापासून परळी शहरातील प्रभाग क्रमांक 3 मधील बरकत नगर भागातील घरोघरी जाऊन स्थानिक नागरिकांशी संवाद साधणार आहेत.
धनंजय मुंडे यांनी परळी शहरातील नागरिकांशी संवाद साधण्याचा उपक्रम सुरू केल्यानंतर त्याला परळीकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला होता. मात्र मध्यंतरी आचार संहिता घोषित झाल्याने या उपक्रमास खंड पडला होता. मात्र धनंजय मुंडे यांनी वाढदिवस अभिष्टचिंतन सोहळ्यात हा उपक्रम पुन्हा सुरू करणार असल्याचे शुक्रवारी घोषित केले.
दरम्यान रविवारी सकाळी 8 वाजल्यापासून माजी मंत्री धनंजय मुंडे हे नवीन प्रभाग क्रमांक 3 मधील बरकत नगर भागात गृहभेटी देणार असून, यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या विविध आघाडी व फ्रंटल सेलच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी उपस्थित राहावे, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष बाजीराव भैय्या धर्माधिकारी यांनी केले आहे.