राज्यापालांच्या भेटीला राजभवनावर पोहचले देवेंद्र फडणवीस सत्ता हस्तांतरणाची घेणार का हाती सूत्र?
एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर देवेंद्र फडणवीस पहिल्यांदाच माध्यमांसमोर आले आहेत आणि त्यांनी थेट राज्यपालांची भेट घेतली आहे
![bhagat singh koshyari devendra fadnavis](https://madhyamnews.com/wp-content/uploads/2022/07/Untitled-design-12.png)
![bhagat singh koshyari devendra fadnavis](https://madhyamnews.com/wp-content/uploads/2022/07/Untitled-design-12.png)
विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे काही वेळापूर्वीच राजभवनावर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या भेटीला पोहचले आहेत. आत्ताच्या घडीची ही सर्वात मोठी बातमी आहे. उद्धव ठाकरे सरकारविरोधात त्यांच्याच पक्षातल्या आमदारांनी बंड पुकारलं आहे. एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासोबतच्या ५१ आमदारांनी बंड पुकारलं आहे तसंच आम्ही पाठिंबा काढणार आहोत असं त्यांनी म्हटलं आहे.
महाराष्ट्रात २१ जूनला एकनाथ शिंदे यांनी सर्वात मोठं बंड पुकारलं आहे. त्यानंतर राज्यात मोठा राजकीय भूकंप झाला आहे. आता जी माहिती मिळते आहे त्यानुसार देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील, प्रवीण दरेकर यांच्यासह दिग्गज नेते राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या भेटीला पोहचले आहेत. सरकार अल्पमतात आलं आहे त्यांना आता लवकरात लवकर फ्लोअर टेस्ट घेतली जावी ही मागणी करत फडणवीस हे राज्यापलांकडे पोहचले आहेत.
राज्यात जो पेच निर्माण झाला आहे त्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे राजीनामा देतील असं वाटलं होतं. त्यांनी तसं ठरवलंही होतं मात्र त्यांनी राजीनामा दिला नाही. उलट बंडखोर आमदारांना परतण्याचं आवाहन करत आज उद्धव ठाकरे यांनी कॅबिनेटची मिटिंगही घेतली. कॅबिनटेच्या बैठकीत राजीनामा देणार नाही हेदेखील त्यांनी सांगितलं. तसंच उद्याही एका मिटिंगची घोषणा करण्यात आली असून उद्या औरंगाबादचं नामकरण संभाजी नगर केलं जाण्यासा मंजुरी मिळू शकते असंही जाहीर करण्यात आलं आहे. त्या पार्श्वभूमीवर विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आता हे आता राज्यपालांच्या भेटीला पोहचले आहेत.
एकनाथ शिंदे गटाने एकीकडे सरकारचा पाठिंबा काढण्याची पूर्ण तयारी केली आहे. तर दुसरीकडे भाजप इतके दिवस या सगळ्या राजकीय नाट्यात आस्ते कदम चाललं होतं. पडद्यामागून सगळ्या हालचाली करत होतं. मात्र आता हे सरकार अल्पमतात आलं आहे हे सांगण्यासाठी देवेंद्र फडणवीस हे राजभवनावर पोहचले आहेत. राज्यपालांनी आता उद्धव ठाकरेंकडे विश्वासदर्शक ठराव मांडण्याची मागणी करावी ही विनंती करायला फडणवीस राज्यपालांच्या भेटीला गेले आहेत.
देवेंद्र फडणवीस यांनी सगळ्या राजकीय नाट्याच्या पार्श्वभूमीवर आजच दिल्लीचा दौरा केला. दिल्ली दौऱ्यानंतर देवेंद्र फडणवीस दीड तासापूर्वी मुंबईत परतले. त्यानंतर दीड तासातच देवेंद्र फडणवीस हे राज्यपालांच्या भेटीला राजभवन या ठिकाणी गेले आहेत. त्यामुळे आता यानंतर काय काय घडणार याकडे महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे.