महाराष्ट्र
लाचखोर कार्यकारी अभियंता संजयकुमार कोकणे निलंबित
Bribery executive engineer Sanjay Kumar Kokane suspended
![](https://madhyamnews.com/wp-content/uploads/2022/08/IMG_20220822_225257.jpg)
![](https://madhyamnews.com/wp-content/uploads/2022/08/IMG_20220822_225257.jpg)
अंबाजोगाई येथील सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता संजयकुमार कोकणे वर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. लाच घेताना कोकणे याला अटक झाल्यानंतर त्यांच्यावर निलंबनाची ही कारवाई झाली. अंबाजोगाई येथील कार्यकारी अभियंता संजय कोकणे हे पदभार स्वीकारल्यापासून वादग्रस्त ठरले होते. गुत्तेदार मंडळींकडून जीविताला धोका असल्याचे सांगत कोकणे याने जिल्हाधिकारी यांच्याकडे पत्र लिहून पिस्तुल परवाना देण्याची मागणी केली होती.
त्यानंतर २२ जून रोजी कोकणे याला लाच घेताना अटक झाली होती. त्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाने कोकणे यांच्यावर निलंबनाची कारवाई केली आहे. निलंबन काळात कोकणे हे मुख्यालयी म्हणजे औरंगाबाद येथे असतील असेही आदेशात म्हटले आहे.